
Dipesh Mhatre inaugurated Electric lighting
ESakal
डोंबिवली : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर डोंबिवली पूर्वेतील फडके रोडवरील मनसेच्या वतीने केली जाणारी विद्युत रोषणाई हे डोंबिवली करांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. मनसेचे नेते राजू पाटील यांच्या हस्ते या रोषणाईचे दरवर्षी उद्घाटन करण्यात येते. मुंबईत मनसेच्या दिपोत्सवाचे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आल्यानंतर डोंबिवलीत देखील मनसेने ठाकरे गटाला येथील मान दिला. शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दिपेश म्हात्रे यांच्या हस्ते दिपोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.