घोटाळ्यांवर बारीक नजर ठेवण्यासाठी 'मनसे'ची शॅडो कॅबिनेट

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 23 January 2020

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कात टाकत हिंदुत्वाचा झेंडा हाती घेत आपली पुढील राजकीय वाटचाल करण्याचा निर्णय घेतलाय. अशात आज दिवसभर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून गोरेगावमधील नेस्को मैदानात महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. यामध्ये कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची दिवसभर वेगवेगळे कार्यक्रम पार पडतायत. काही महत्त्वाचे ठराव देखील मांडण्यात येणार आहेत. राज ठाकरे यांचा एखादा कार्यक्रम आणि त्यात एखादी अनोखी गोष्ट नाही असं होत नाही. अशातच दिवस जसा जाईल तसतसे या महाअधिवेशनातून नवनवीन खुलासे होताना पाहायला मिळतील. 

मोठी बातमी महाविकास आघाडीला रोखण्यासाठी गणेश नाईकांची खेळी..

अशातच आता मनसेच्या महाअधिवेशनातून एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येतेय. याबद्दलची  घोषणा आज मनसेचे नेते नितीन सरदेसाई करणार आहेत. दुपारच्या सुमारास ही घोषणा केली जाणार आहे. ही घोषणा असणार आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुरु करणार असलेल्या शॅडो कॅबिनेटची. राज ठाकरेंच्या मनसैनिकांची आता सरकारवर आणखी बारीक नजर असणार आहे. मनसेने राज्य सरकारच्या कारभारावर नजर ठेवण्याचा निर्धार केलाय. महाराष्ट्र नवनिर्माण सेना मंत्रिमंडळावर शॅडो कॅबिनेटची निवड करणार आहे. 

मोठी बातमी आता ATM शिवाय काढा २० हजारांपर्यंत रक्कम कॅश..

या शॅडो कॅबिनेटमध्ये पक्षाचे जे नेते आहेत त्यांना मंत्रालयांची जबाबदारी देण्यात येणार आहे. या शॅडो कॅबिनेटच्या माध्यमातून  सरकारकडून काही घोटाळे होतायत का ? कोणता मंत्री किती कामं करतोय ? कामं करतोय की करत नाही ?  कोणती कामं होतायत, कोणती कामं होत नाहीत ? घोटाळे, या सर्वांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना बारीक नजर ठेऊन असणार आहे. 

याबाबत अजून अधिकृत घोषणा झालेली नाही, आज दुपारी याबाबत अधिकृतरीत्या घोषणा केली जाणार आहे. दरम्यान आता मनसेच्या कोणत्या नेत्याकडे सरकारमधील कोणत्या खात्याची आणि मंत्र्यावर नजर ठेवण्याची जबाबदारी असणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. 

मोठी बातमी - तो तिला गोडबोलून घरी घेऊन जायचा आणि...

mns to form shadow cabinet to keep close aye on mahavikas aaghadi ministers and their scams

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mns to form shadow cabinet to keep close aye on mahavikas aaghadi ministers and their scams