Loksabha Election: लोकसभेसाठी 'मनसे' तयारी ; रणनिती आखण्यास सुरुवात!

Raj Thackeray
Raj Thackerayesakal

Loksabha Election: आगामी लोकसभा निवडणूकीसाठी संभाव्य उमेदवारांची यादी जाहीर करत मनसेने निवडणूक लढविण्याचे सुतोवाच दिले. पक्षप्रमुखांनी अद्याप पक्षाची भूमिका जाहीर केली नसली तरी हे संभाव्य उमेदवार मात्र निवडणूकीच्या कामाला लागले आहेत. या मतदार संघावर आपली पकड घट्ट करण्यासाठी मनसेने हालचाली सुरु केल्या आहेत.

निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर डोंबिवली नंतर उल्हासनगर, भिवंडी, बदलापूर या ठिकाणच्या पदाधिकाऱ्यांच्या नवनियुक्त्या करण्यात येणार आहेत. तसेच येत्या काही दिवसांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे कल्याण लोकसभा दौऱ्यावर येणार आहेत. येथील मताधिक्क्यांचा आकडा वाढविण्यासाठी मनसे कशी रणनिती आखते हे आता पहावे लागेल.

Raj Thackeray
MNS Toll Plaza Agitation: पिंपळगाव टोलनाक्यावर मनसेचे आंदोलन; टोलचे दांडे बाजूला सारून वाहनांना मोफत प्रवास

2019 च्या लोकसभा निवडणूकीत उमेदवार न देता तटस्थ राहीलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची यंदा 'मनसे' तयारी सुरु झाली आहे. संभाव्य उमेदवारांची यादी पक्षाच्या वतीने जाहीर करण्यात आली असली त्या नावांवर अद्याप शिक्कामोर्तब करण्यात आलेले नाही. शिवाय पक्षप्रमुख ठाकरे यांनी देखील यंदा निवडणूक लढणार की नाही हे स्पष्ट केलेले नाही.

परंतू मनसेचे संभाव्य उमेदवार मात्र आपल्या आपल्या मतदारसंघात सक्रीय झाले आहेत. पक्ष प्रमुख राज ठाकरे, मनसे नेते अमित ठाकरे यांनी या मतदारसंघाचा दौरा करत आढावा घेतला आहे. राज यांनी पक्षातील पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते यांच्या बैठका घेत पदाधिकाऱ्यांच्या नवनियुक्त्या जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. याची सुरुवातच कल्याण लोकसभा मतदारसंघापासून सुरु झाली आहे.

डोंबिवली शहर अध्यक्ष मनोत घरत यांची या पदावरुन उचलबांगडी करत त्याठिकाणी राज यांचे निकटवर्तीय राहूल कामत यांची वर्णी लावण्यात आली आहे. विद्यार्थी सेनेपासून कामत हे राज यांच्यासोबत आहेत. मनोज यांच्याविषयी पक्षप्रमुखांकडे तक्रारी गेल्याने त्यांची पदावरुन बदली केल्याच्या चर्चा शहरात आहेत. मात्र मनोज घरत हे पक्षातील एक आक्रमक असे युवा नेतृत्व असून तेही राज यांचे निकटवर्तीय आहेत. टोलनाक्याच्या मुद्दयावरुन मनोज यांना जेलवारी घडली आहे.

पक्षातील पदाधिकारी इतर पक्षात उड्या मारत असताना पक्षाचा एक बुलंद आवाज म्हणून मनोज हे उभे राहीले असून डोंबिवली शहर अध्यक्ष पदाची धुरा त्यांनी योग्य सांभाळली. गेल्या काही दिवसांपासून त्यांचा हा आक्रमकपणा काहीसा कमी झाल्याने त्यांच्या कामकाजावर शंका उपस्थित केली जात असली तरी पक्षाकडून त्यांना लोकसभा, विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

पक्षाकडून लोकसभा निवडणूक लढविली जाईल याविषयी स्पष्ट भूमिका मांडली गेली नसली तरी आमदार राजू पाटील यांनी कल्याण आणि भिवंडी लोकसभेची तयारी सुरु असल्याचे सुतोवाच दिले आहेत. तत्पूर्वी मनसेने येथे दोनवेळा उमेदवार उभे केले होते. 2009 च्या निवडणूकीत वैशाली दरेकर यांनी 1 लाख 2 हजार मते घेतली होती, तर 2014 च्या निवडणूकीत राजू पाटील यांनी 1 लाख 22 हजार 349 मते घेत ही मनसेची गठ्ठा मते असल्याचे सिद्ध केले.

दरेकर व पाटील हे दोघेही तिसऱ्या क्रमांकावर राहीले होते. मागील वर्षी मनसेने उमेदवारच उभे केले नव्हते. 2019 विधानसभा निवडणूकीत राजू पाटील हे 93 हजार 927 मते घेत विजयी झाले होते. मनसेचे ते एकमेव आमदार आहेत. लोकसभेत एकदा पराभव स्विकारावा लागला असला तरी दुसऱ्यांदा ते रिंगणात उतरण्यास तयार असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Raj Thackeray
MNS Raju Patil : तुमचा हा कोकणी स्वाभिमान का जागा झाला नाही? राजू पाटील यांनी दिले सडेतोड उत्तर

साधारण वर्षभराच्या कार्यकाळात लोकसभा, विधानसभा महापालिका निवडणुका येतील. त्या अनुषंगाने येथे भिवंडी आणि कल्याण लोकसभा असेल यात काही पाक्षिक बदल करण्याचा विचार पक्षप्रमुख राज ठाकरे यांचा असेल त्यानुसार त्यांनी केलेला हा पहिला बदल आहे. हा बदल करण्यामागे आमचे पूर्वीचे शहराध्यक्ष मनोज घरत यांनी काही चांगले कामे केले नाहीत असा बिलकुल अर्थ नाही. त्यांनी त्यांच्या परीने खूप चांगली कामे केली आणि लोकांची सहानुभूती पण आहे. मी पूर्वी मनसे कामगार सेनेत पदाधिकारी होतो, नंतर जिल्हाध्यक्ष, सरचिटणीस झालो आता नेता आहे. त्यामुळे ही पदाची अदलाबदल होत असते. मनोज घरत कल्याण ग्रामीणचे अध्यक्ष असताना इथे पूर्वीचे शहराध्यक्ष जे इतर पक्षात गेले ते गेल्यावर पुन्हा मनोज हे शहराध्यक्ष झाले. सकारात्मक असे काही बदल करायला हवेत. राहुल कामत हे काही निवडणुका लढायला उत्सुक नाहीत. निवडणूक काळात शहराध्यक्ष सारख महत्वाचे पद मोकळे असायला हवे त्याअनुषंगाने केलेला हा बदल आहे.

-राजू पाटील, आमदार, मनसे

Raj Thackeray
MNS Raju Patil : तुमचा हा कोकणी स्वाभिमान का जागा झाला नाही? राजू पाटील यांनी दिले सडेतोड उत्तर

आगामी ज्या निवडणुका आहेत मग त्या कल्याण लोकसभा असतील, विधानसभा असतील किंवा येणाऱ्या महानगरपालिकेच्या असतील. त्यादृष्टीने संघटनात्मक बांधणी आणि जास्तीत जास्त घवघवीत यश मिळावे असा प्रयत्न असेल. आणि खासदार निवडून येणार ज्याला आमचे विद्यमान आमदार राजू पाटील यांचे नाव आता चर्चेत आहे त्यादृष्टीने खरंच जर निवडणूक लढवायची झाली. त्यांच्या नावावर साहेबांनी शिक्कामोर्तब केलं. तर त्यादृष्टीने खासदार निवडून येण्याची संपूर्ण तयारी या लोकसभेत व्हावी. त्यादृष्टीने आज संपूर्ण डोंबिवली शहराची जबाबदारी माझ्यावर दिली आहे. त्याच्यानंतर डोंबिवली विधानसभा, कल्याण ग्रामीण विधानसभा आहे आणि ज्या काही 122 किंवा पॅनल नुसार 133 जागा महापालिकेतील असतील. त्यातल्या जास्तीत जास्त जागा निवडून आणून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवर मनसेचा महापौर बसवणं हा त्यामागचा उद्देश आणि त्यासाठी उचललेला हे पहिलं पाऊल आहे.

- राहुल कामत, डोंबिवली शहराध्यक्ष, मनसे

Raj Thackeray
MNS News : "राज्यभरात जेवढे मनसेचे कार्यकर्ते तेवढेच रस्त्यावर खड्डे!"; दिपाली सय्यदांचा खोचक टोला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com