संशोधनातून समोर आली नवीन माहिती, 6 फूट उंच व्यक्तींना कोरोनाचा धोका अधिक

संशोधनातून समोर आली नवीन माहिती, 6 फूट उंच व्यक्तींना कोरोनाचा धोका अधिक

मुंबई - आपण उंच असाल तर काळती घ्या, कारण 6 फूट उंच व्यक्तीना कोरोनाची बाधा अधिक होत असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. मँचेस्टर ओपन युनिव्हर्सिटी अंतर्गत जगभरातील संशोधकांनी केलेल्या संशोधनातून हा निष्कर्ष समोर आला आहे. याला एरोसोल ट्रांन्समिशन असे नाव देण्यात आले आहे.

जगभरातील संशोधकांच्या टीमने अमेरीकेसह इतर देशांतील 2 हजाराहून अधिक लोकांचा अभ्यास केला. लोकांचे दैनंदीन व्यवहार, ते करत असलेले काम तसेच त्यांची जगण्याची पद्धत यानुसार कोरोना संसर्ग पसरत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले आहे, अशी माहीती इंडीयन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ अविनाश भोंडवे यांनी सांगितले. 

...तर धोका फार उद्भवला नसता 

उंच व्यक्तींना कोरोना संसर्गाचा अधिक धोका असल्याचे समोर आले आहे. एखाद्या बाधीत व्यक्तीच्या तोंडातून निघालेले विषाणू हवेत पसरतात. मात्र हे विषाणू बराच वेळ 6 फूट अंतरावर हवेत तरंगत असल्याने त्यातून दुसर्या उंच व्यक्तीला बाधा पोहोचते. केवळ तोंडातून निघालेल्या थुंकीतून विषाणू पसरले असते तर हा धोका फार उद्भवला नसता असे ही अहवालात नमूद करण्यात आले असल्याचे डॉ भोंडवे यांनी सांगितले.

कोरोनाबाबत नवीन माहीती समोर

नवीन निष्कर्षांमुळे कोरोनाबाबत नवीन माहीती समोर आली आहे. कोरोना विषाणू केवळ बाधिताच्या तोंडातून बाहेर पडलेल्या बिंदूकातून पसरत नाही तर हवेतून ही पसरत असल्याचे निष्पन्न झाले असल्याचेही डॉ. भोंडवे पुढे म्हणाले. त्यामुळे आता बाहेर वावारतांना आपल्याला अधिक काजळी घेण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले. याबाबतची माहीती याआधीही समोर आली होती,मात्र यावेळी जगभरातील लोकांचा अभ्यास करण्यात आल्याने हे निष्कर्ष महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितलं.

म्हणून सोशल डिस्टंसिंग महत्वाचे

बाधितांच्या तोंडातून लिघालेल्या ड्रॉपलेट्ससह हवेतूनही विषाणू पसरत असल्याने सोशल डिस्टंसिंग महत्वाचे असल्याचं संशोधक सांगतात. शिवाय मास्क घालणे हे देखील महत्वाचे असून हा चांगला पर्याय असल्याचे ही ते पुढे म्हणाले. याशिवाय आपण राहत असलेली ठीकाणं स्वच्छ करणे देखील महत्वाचे आहे. 

हवेतून  संसर्ग पसरण्याचा धोका अधिक

ड्रॉपलेट्स शिवाय हवेतून  संसर्ग पसरण्याचा धोका अधिक आहे. ड्रॉपलेट्स हे एरोसोल पेक्षा मोठे असतात, त्यामुळे ते कमी प्रमाणात पसरत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. मात्र एरोसोल हेवच्या दिशेनुसार सर्वत्र पसरत असल्याचे ही निदर्शनास आले असल्याचे दिसते.

सार्वजनिक ठिकाणं, शौचालये, स्वयंपाकघर वापरल्याने संसर्ग पसरण्याचा अधिक धोका असल्याचे ही अहवालात नमूद करण्यात आले आहे. यामुळे कोरोना संसर्ग होण्याचा धोका हा 3.5 टक्के अधिक असल्याचेही या अहवालात नमूद करण्यातआल्याचे डॉ भोंडवे यांनी सांगितले.

( संकलन - सुमित बागुल )

six feet tall person is more likely to get corona infection says research

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com