

Raju Patil criticism of BJP and shinde Shivsena
ESakal
डोंबिवली : डोंबिवलीत सध्या सुरू असलेल्या पक्षांतर, सत्ता समीकरणांच्या हालचालींवर मनसेचे आमदार राजू पाटील यांनी आज पत्रकार परिषदेतून सत्ताधाऱ्यांवर आणि विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. कल्याण-डोंबिवलीतील बिकट परिस्थिती, पक्ष प्रवेश, विकासकामांची गुणवत्ता आणि भ्रष्टाचार यावर थेट नामोल्लेख न करता त्यांनी भाजप आणि शिंदे गटाला लक्ष्य केले. “हे एकाच थाळीचे चट्टेबट्टे आहेत. भांडतोय असं दाखवतात, पण एकाच थाळीतून खातात,” असा घणाघात करत त्यांनी सध्याच्या राजकारणातील स्वार्थी संगनमतावर बोट ठेवले.