Navi Mumbai: नवी मुंबईतील 'या' १४ गावांच्या विकासासाठी निधी द्या, मनसे नेते राजू पाटील यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी
NMMC News: नवी मुंबई महापालिकेत कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील १४ गावांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र त्यांचा विकास झाला नसल्यामुळे यासाठी निधी मिळावा, अशी मागणी मनसेचे नेते राजू पाटील यांनी केली आहे.
डोंबिवली : कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील १४ गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेश करण्यात आला आहे. मात्र नवी मुंबई महापालिकेने अद्याप या गावांचे दप्तर हाती घेतलेले नसल्याने १४ गावांचे घोंगडे भिजत पडले आहे.