Sandeep Deshpande: संदीप देशपांडेंवरील हल्ल्यातील मास्टरमाईंडबाबत मोठी अपडेट; राजकीय नेत्याचा... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sandeep Deshpande

Sandeep Deshpande: संदीप देशपांडेंवरील हल्ल्यातील मास्टरमाईंडबाबत मोठी अपडेट; राजकीय नेत्याचा...

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर काही दिवसांपुर्वी मॉर्निंग वॉकला गेल्यानंतर काही लोंकानी हल्ला केला. या प्रकरणानंतर मोठी खळबळ उडाली होती. मनसे नेत्यांनी या हल्लाप्रकरणी पत्रकार परिषद घेऊन थेट ठाकरे गटाच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले होते. घटनेनंतर या हल्ल्याचा मास्टरमाईंड कोण आहे याबाबत अनेक तर्कवितर्क लावण्यात आले होते.

मात्र या हल्ल्यामध्ये कोणत्याही वरीष्ठ राजकीय नेत्याचा समावेश नसल्याचे तपासात निष्पन्न झालं असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली आहे. अटकेतील चौघांपैकी अशोक खरात हाच मुख्य आरोपी असल्याचे निष्पन्न झालं आहे.

संदीप देशपांडे यांच्यावर हल्ल्यानंतर प्रसिद्धी मिळून येणाऱ्या पालिका निवडणुकीत उमेदवारी मिळेल, या आशेने अशोक खरातने हा कट रचल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. यासंबधी वृत्त 'साम' या वृत्तवाहिनीने दिले आहे. दरम्यान या प्रकरणात मनसे नेते अमेय खोपकरांनी आदित्य ठाकरे-संजय राऊतांचे नाव घेतल्याने वातावरण तापलं होतं.

काय आहे संपुर्ण प्रकरण?

मनसे नेते संदीप देशपांडे 3 मार्च रोजी पहाटेच्या सुमारास शिवाजी पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी निघाले होते. नेहमी त्यांच्यासोबत दोन-चार मित्र असतात. मात्र त्या दिवशी ते एकटेच होते. ही संधी साधून हल्लेखोरांनी त्यांच्यावर मागून हल्ला केला. हल्लेखोरांच्या हातात स्टम्प आणि रॉड होते. त्यांनी संदीप देशपांडे यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला.

मात्र, देशपांडे यांनी चांगलाच प्रतिकार केला होता. दरम्यान, हल्लोखोरांशी झटापट करत असताना संदीप देशपांडे यांच्या हात आणि पायाला गंभीर दुखापत झाली. मात्र त्यांना डोक्याला किंवा शरीरावर इतर कुठे जखम झाली नाही. हल्ल्यानंतर शिवाजी पार्कमधील लोक त्यांच्या मदतीला धावले. तोपर्यंत हल्लेखोर पळून गेले. त्यानंतर संदीप देशपांडे यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पत्रकार परिषद घेत त्यांनी ठाकरे गटावर आरोपही केले होते.