esakal | 'अयोध्येला जाताय तेव्हा जनाची नाही किमान मनाची तरी...' मनसेच्या शुभेच्छा!
sakal

बोलून बातमी शोधा

MNS leader Sandeep Deshpande criticized Uddhav Thackeray indirectly

'अयोध्येला जाताय तेव्हा जनाची नाही किमान मनाची तरी...' मनसेच्या शुभेच्छा!

sakal_logo
By
वृत्तसंस्था

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्रात सत्ता आल्यानंतर प्रथमच आयोध्या दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत. राम मंदिर स्थापनेचा निर्णय झाल्यानंतर उद्धव यांनी आयोध्या दौरा करणार असे जाहीर केले होते. मात्र, त्यांच्या दौऱ्यापूर्वीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुख्यमंत्र्यांवर कडाडून टीका केली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करत उद्धव यांना आयोध्येला जाण्यापाूर्वी टोला लगावला आहे. 

मोठी बातमी - १२ वर्षांपूर्वी केलेली कोरोबाबाबतची 'ही' भविष्यवाणी खरी ठरणार ?

महाराष्ट्रातील मोठ्या सत्त्यानाट्यानंतर महाआघाडीचे सरकार स्थापन झाले. शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या तीन पक्षांनी मिळून सत्ता स्थापन केली. यानंतर शिवसेनेवर भाजपकडून टीकाही झाली. मात्र आता चक्क मनसेकडूनही उद्धव यांना टीकेला सामोरे जावे लागत आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करून मुख्यमंत्र्यांचे थेट नाव नघेता टीका केली आहे. 

मोठी बातमी - मेघनाच्या मृत्यूचं गूढ उकललं, जिम ट्रेनरनेच दिलेलं...

देशपांडे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हणले आहे की, 'लक्षात ठेवा, प्रभू रामचंद्रांनी वडीलांच्या सांगण्यावरून सत्तेला लाथ मारून चौदा वर्ष वनवास भोगला आणि भरताला राज्य दिले. पण भरताने संधीसाधू पणा न करता रामचंद्रांच्या पादुका ठेवून राज्य केले. असा इतिहास असलेल्या अयोध्येला जाताय तेंव्हा जाताना  जनाची नाही किमान मनाची तरी.... शुभेच्छा' अशा बोचऱ्या भाषेत देशपांडेंनी शुभेच्छा दिल्या आहेत. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या - ७ मार्चला अयोध्या दौऱ्यावर जातील. त्यांच्यासोबत यावेळी कुटूंबिय व शिवसेनेचे काही महत्त्वाचे पदाधिकारी असतील.