
मुंबई : पावसाळी अधिवेशनात गणेशोत्सवाला "राज्य महोत्सवाचा" दर्जा देण्यात आला आहे. मात्र तरीही काही खाजगी शाळा व कॉलेजांमध्ये उत्सवाच्या काळात परीक्षा ठेवण्यात आल्याची तक्रार आमच्या पर्यंत पोहोचली आहे. अशाने उत्सवात सहभागी होण्यात लोकांना अडचणी येणार आहेत. यामुळे यादरम्यान परीक्षा जाहीर केल्या असतील तर त्या ताबडतोब रद्द करा. अन्यथा मनसे स्टाईलने उत्तर दिले जाईल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आणि मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी दिला.