Dombivli : मनसे आमदार राजू पाटील खासदार डॉ.शिंदे यांच्या पाठीशी

कल्याण लोकसभेतील मनसेच्या मुख्य पदाधिकारी यांची बैठक पडली पार...
mns mla raju patil support to mp shrikant shinde mahayuti kalyan lok sabha poll
mns mla raju patil support to mp shrikant shinde mahayuti kalyan lok sabha pollSakal

डोंबिवली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. महायुतीचे उमेदवार जिंकून आणण्यासाठी लोकसभा समन्वयक पदाधिकाऱ्यांची नियुक्ती मनसेकडून करण्यात आली आहे.

कल्याण व भिवंडी लोकसभेची धुरा आमदार राजू पाटील यांच्यावर सोपवण्यात आली आहे. कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना विजयी करण्यासाठी पाटील हे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले असून नुकतीच मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी आमदार पाटील यांनी पदाधिकाऱ्यांना कशा पद्धतीने काम करायचे याच्या सूचना दिल्याचे समजते.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बिनशर्त पाठींबा दिल्यानंतर महायुतीचे कल्याण लोकसभेचे उमेदवार खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांना निवडून आण्यासाठी मनसे मैदानात उतरली आहॆ. आमदार राजू पाटील यांच्या कार्यालयात गुरुवारी मनसे विभाग प्रमुख व पदाधिकारी यांची एक बैठक पार पडली.

यावेळी महायुतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी कशा पद्धतीने पदाधिकाऱ्यांना काम करायचे आहे. याच्या सूचना आमदार राजू पाटील यांनी त्यांना दिल्या असल्याचे समजते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बिनशर्त पाठींबा कां दिला? हेही समजून सांगितले आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांची मत जाणून घेतली.

तसेच मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये काही प्रमाणात भाजप, शिवसेना यांच्या विषयी नाराजी असून त्यांचे काम का करायचे ? अशा शंका पदाधिकाऱ्यांनी यावेळी आमदार पाटील यांना विचारल्या. त्यांच्या शंकांचे निरासन करून पुढील लक्ष गाठण्यासाठी काम करण्याच्या सूचना आमदार पाटलांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या. पक्षाचा आदेश समजून काम करणार असल्याचे यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

त्यामुळे राजकीय पटलावर एकमेकांच्या विरोधात असलेले आणि कट्टर विरोधक मनसे आमदार राजू पाटील हे शिवसेना शिंदे गटाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना विजयी करण्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले असल्याचे दिसत आहे. आता खासदार शिंदे यांच्या प्रचारात त्यांचा कसा सहभाग असेल हे पहावे लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com