यांची लायकी आहे का? मनसे आमदाराचा शिवसेना पदाधिकाऱ्यांवर निशाणा

जलकुभांची जागा श्रेयवादावरुन मनसे - सेनेत टोलवाटोलवी
mla raju patil
mla raju patil
Summary

जलकुभांची जागा श्रेयवादावरुन मनसे - सेनेत टोलवाटोलवी

डोंबिवली : केंद्र व राज्य सरकारच्या अमृत योजनेंतर्गत कल्याण डोंबिवली महापालिका(kalyan - dombivali carporation) हद्दीतील 27 गावांत पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतील जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरु असतानाच जलकुंभासाठीच्या जागेचा प्रश्न मात्र प्रलंबित होता. जिल्हाधिकाऱ्यांनी जलकुंभाच्या जागेसाठी काही जागा या महापालिका प्रशासनास नुकत्याच हस्तांतरीत केल्या आहेत. या कामांवरुन आता मनसे शिवसेनेत टोलवाटोलवीचे राजकारण सुरु झाले आहे. जागांसाठी पाठपुरावा करणारे मनसे आमदार राजू पाटील(mns mla raju patil) यांनी याविषयीची माहिती देताच शिवसेनेचे पदाधिकारी दिपेश म्हात्रे यांनी आमदारांनी विकास कामाचे श्रेय लाटण्यात पीएचडी केली असल्याचे बोलले. यावर आमदार पाटील यांनी श्रेय लाटण्यात डब्बल पीएचडी केलेले, तसेच मालक बनून फिरण्याऐवजी बाऊन्सर बनून फिरणाऱ्यांनी आमच्यावर टिका करु नये असा टोला दिपेश यांना लगावला आहे. यावरुन भाजपाने देखील शिवसेनेला चांगलेच ट्रोल(bjp trolls shivsena) केले असल्याचे पहायला मिळाले.

mla raju patil
सीबीएससी इंग्रजी शाळा दाखवून मराठी माणसांना भुलवण्याचे काम: भाजपची टीका

कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील 27 गावांत अमृत योजनेअंतर्गत पाणी पुरवठा योजनेचे काम सुरु आहे. जलवाहिन्या टाकण्याचे काम अत्यंत संथगतीने सुरु असले तरी हे काम काहीअंशी पूर्ण होत असताना जलकुंभाची उभारणी देखील गतीने झाल्यास काम लवकर पूर्णत्वास जाईल या उद्देशाने जलकुंभ उभारणीचा पाठपुरावा जिल्हा प्रशासनाकडे सुरु होता. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडे सुरु असलेल्या पाठपुराव्यानंतर जलकुंभासाठीची जागा जिल्हा प्रशासनाने महापालिकेस हस्तांतरीत केल्या आहेत.

जागेचा प्रश्न मार्गी लागल्याने लवकरच गावांतील पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल अशी माहिती मनसे आमदार राजू पाटील यांनी प्रसार माध्यमांना दिली. यावर शिवसेनेचे पदाधिकारी दिपेश म्हात्रे यांनी मनसे आमदारांनी कामाचे श्रेय लाटण्याच पीएचडी केले आहे. जलकुंभासाठी लागणाऱ्या जागा या सरकारी होत्या, त्यासाठी केडीएमसीला ठराविक रक्कम सरकारला द्यावी लागणार होती. ही रक्कम माफ करण्यात यावी यासाठी खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे व पालकमंत्री एकनाथ शिंदे हे सातत्याने पाठपुरावा करीत होते. त्यामुळे आमदार पाटील यांनी त्याचे श्रेय लाटू नये असे दिपेश बोल दिपेश यांनी लगावले होते.

mla raju patil
ज्येष्ठ गायक अभिनेते पंडित रामदास कामत यांचं निधन

या टिकेला उत्तर देताना पाटील म्हणाले, टक्केवारी खाण्यात डब्बल पीएचडी केलेल्यांनी माझ्याविषयी बोलू नये. सप्टेंबर महिन्यात पार पडलेल्या दिशा बैठकीत केंद्रीय मंत्री कपिल पाटील उपस्थित होते. त्यांनीच जलकुंभ जागेचा प्रश्न लवकर मार्गी लावण्याच्या सूचना प्रशासनास केल्या होत्या. त्यानुसार हा प्रश्न मार्गी लागला आहे. माझ्याकडे सर्व पत्रव्यवहार आहे. यासाठी इतर कोणी पाठपुरावा केला नाही असे मी म्हणालोच नाही आहे. ठाण्यावरुन सांगितले जाते म्हणून हे बोलणार. हे आता सहन केले जाणार नाही असा इशारा देखील पाटील यांनी यावेळी शिवसैनिकांना दिला.

यापूर्वी ही मानपाडा रस्त्याच्या कामावरुन शिवसेना खासदार व मनसे आमदार यांच्यात राजकारण रंगले होते. आता जलकुंभाच्या जागेच्या श्रेयावरुन पुन्हा एकदा मनसे - शिवसेनेत जोरदार टोलवा टोलवी सुरु झाली आहे. यावेळी भाजपाने मनसे आमदार यांना साथ देत त्यांचे व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल केले असून यावर आता शिवसेना काय उत्तर देते हे पहावे लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com