Raj Thackeray: विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलच्या पदाधिकाऱ्यांचा मनसेत प्रवेश

जिल्हाध्यक्षसह बदलापूर येथील 60 कार्यकर्त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत केला प्रवेश
Raj Thackeray vishva hindu parishad
Raj Thackeray vishva hindu parishad sakal

Raj Thackeray: विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी मनसेचा झेंडा हाती घेत पक्षात प्रवेश केला.

जिल्हाध्यक्षसह बदलापूर येथील 60 कार्यकर्त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश केला आहे.

Raj Thackeray vishva hindu parishad
Nashik MNS News: सार्वत्रिक निवडणुकांसाठी मनसेची नाशिकमधून तुतारी! महिला दिनी राज ठाकरेंच्या हस्ते श्री काळाराम मंदिरात आरती

कल्याण पश्चिम येथे झालेल्या बैठकीत राज ठाकरे यांनी आज पक्षाच्या कल्याण पश्चिम आणि कल्याण पूर्व विधानसभा तसेच बदलापूर येथील शहराध्यक्ष, उप शहराध्यक्ष, शाखाध्यक्ष, उप शाखाध्यक्ष, विभागअध्यक्ष , उपविभागअध्यक्ष आदी महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली.

लोकसभा निवडणूक लढवावी का ? ती स्वबळावर की कोणासोबत लढवायची आदी प्रश्नांचा पदाधिकाऱ्यांच्या मनातील कानोसा घेतला. तसेच येत्या 29 फेब्रुवारी पर्यंत आपापल्या विभागातील पदाधिकाऱ्यांची यादी गोळा करण्याचे सांगत लोकसभा निवडणुकीबाबत आपण तेव्हाच भूमिका स्पष्ट करू असेही या बैठकीत राज ठाकरे यांनी स्पष्ट केल्याचे समजते.

Raj Thackeray vishva hindu parishad
Nashik MNS News : ‘मनसे’कडून 51 हजार बुंदी लाडूंची मेजवानी! तयारी रामलल्ला मुर्ती प्रतिष्ठापनाची

दरम्यान विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल जिल्हाध्यक्ष, सह बदलापूर येथील 60 कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश केला.

याबाबत सचिन धुळे यांना विचारले असता त्यांनी सांगितले देव देश धर्म रक्षणासोबतच पक्षाची हि गरज लागते आणि हिंदुत्वच रक्षण करणारे राज ठाकरे यांचं नेतृत्व आम्हांला आवडत आणि बदलापुरात मनसेला मजबूत करून मुरबाड विधानसभा मतदार संघ आम्हाला कसा मजबूत करता येईल या करता आम्ही प्रयत्न करणार आहोत असं मत त्यांनी बोलताना व्यक्त केले.

Raj Thackeray vishva hindu parishad
MNS News: दुकानदारांना गुलाबपुष्प देत मराठी पाट्यांसाठी येवल्यात मनसेची गांधीगिरी! 8 दिवसांचा अल्टिमेटम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com