

Model Harsha Sani Arrested in Drug Case
ESakal
मुंबई : सौंदर्य स्पर्धेतील उपविजेती मॉडेल हर्षा सनीला मुंबई विमानतळावर सीमाशुल्क विभागाने १२ कोटी रुपयांच्या अमली पदार्थांसह पकडले आहे. हर्षा सनी बँकॉकहून मुंबईत आली होती. २९ वर्षीय हर्षा सनी एका खासगी बँकेत रिलेशनशिप मॅनेजर म्हणून काम करते. ती गेल्या वर्षी मे महिन्यात झालेल्या 'मिसेस केरळ ग्लोबल २०२५' स्पर्धेत उपविजेती ठरली होती.