Aryan Khan : सीबीआयकडून आर्यन खान प्रकरणात मॉडेल मुनमुन धमेचाची चौकशी

आर्यन खान लाच प्रकरणात माजी अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या चौकशीच्या संदर्भात सीबीआयने गुरुवारी मॉडेल मुनमुन धमेचा यांची चौकशी केली.
Aryan Khan with munmun dhamecha
Aryan Khan with munmun dhamechasakal

मुंबई - आर्यन खान लाच प्रकरणात माजी अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या चौकशीच्या संदर्भात सीबीआयने गुरुवारी मॉडेल मुनमुन धमेचा यांची चौकशी केली आहे. मुनमुन धमेचा गुरूवारी सकाळी सीबीआय मुख्यालयात तपास पथकासमोर हजर झाली.

क्रुझ ड्रग्ज प्रकरणात आर्यनसह मुनमुन धमेचाला अटक करण्यात आली होती. त्यानंतर तात्कालीन एनसीबी अधिकारी समीर वानखेडेंवर आर्यन खानला सोडवण्यासाठी 25 कोटींची लाच मागीतल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. या प्रकरणी सध्या समीर वानखेडेची चौकशी सुरू आहे.

मुनमुन धमेचा कोण?

ज्या कोर्डेलीया क्रुझ ड्रग्स प्रकरणात आर्यन खानला अटक झाली होती. त्यात आर्यनसोबत मॉडेल मुनमुन धमेचालाही अटक करण्यात आली होती. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्याकडून लाच मागितल्याप्रकरणी सध्या समीर वानखेडेची चौकशी सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार समीर वानखेडे लाच प्रकरणात मुनमुनला सीबीआयने चौकशीसाठी आणि जबाब नोंदवण्यासाठी बोलावले होते. ऑक्टोबर 2021 मध्ये, मुनमुन धमीचालाही ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. याशिवाय सीबीआयकडून शाहरुख खान आणि त्याच्या मुलाला आर्यनका सुद्धा जबाब नोंदवण्यासाठी बोलावण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com