esakal | 'सुखकर्ता दु:खहर्ता' म्हणत चाकरमान्यांचा 'मोदी एक्स्प्रेस' मधून प्रवास सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

Modi express

'सुखकर्ता दु:खहर्ता' म्हणत चाकरमान्यांचा 'मोदी एक्स्प्रेस' मधून प्रवास सुरू

sakal_logo
By
कुलदीप घायवट

मुंबई : गणेशोत्सवासाठी (Ganpati Festival) कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी (konkan commuters) 'मोदी एक्सप्रेस' (modi Express) मंगळवारी, (ता.7) रोजीपासून धावू लागली. चाकरमान्यांनी 'सुखकर्ता दुखहर्ता', गणपती बाप्पा मोरया' म्हणत मोदी एक्स्प्रेसमधून कोकणात जाण्यासाठी प्रवास सुरू झाला. या गाडीला केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) , विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (pravin darekar) आणि आमदार नितेश राणे (nitesh Rane) यांनी या गाडीला दादर (dadar) स्थानकावरून हिरवा झेंडा दाखवला. एकूण 1 हजार 800 चाकरमान्यांना घेऊन ही गाडी सावंतवाडीच्या दिशेने रवाना झाली.

हेही वाचा: कार्यकर्ते महिलांवर अत्याचार करणार नाहीत; नवाब मलिक हमी देतील का ?- शीतल देसाई

पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या संकल्पनेतून 225 ट्रेन कोकणवासीयांसाठी सोडल्या आहेत. महाराष्ट्रात गणपती उत्सव अत्यंत आनंदाने साजरा केला जातो. 'मोदी एक्स्प्रेस' ही गाडी कोकणात जाणार आहे. या रेल्वे मुळे कोकणवासियांमध्ये आनंदाचे वातावरण आहे, असे केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे म्हणाले.

दरवेळी गणेशोत्सवानिमित्त चाकरमान्यांना कोकणात जाण्यासाठी बस सेवा पुरविली जाते. मात्र, यंदा नारायण राणेंना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोकणाला आशीर्वाद दिला आहे. त्यामुळे त्यांचे आभार मानण्यासाठी गणेश चतुर्थीसाठी मोदी एक्स्प्रेस सोडण्यात आली, अशी प्रतिक्रिया आमदार नितेश राणे यांनी दिली. दरम्यान, ही ट्रेन दादरहून कणकवली, वैभववाडी आणि सावंतवाडीपर्यंत धावणार आहे.

हेही वाचा: मुंबई -अहमदाबाद महामार्गावरील समस्यांच्या निषेधार्थ आंदोलन

- मोदी एक्स्प्रेस या नावाची ट्रेन यावर्षी कोकणातल्या आणि विशेषतः सिंधुदुर्गातल्या चाकरमान्यांना गावाकडे घेऊन जाणार आहे.

- यात एकूण 1 हजार 800 जणांचा प्रवास होणार आहे.

- हा प्रवास पूर्णपणे विनामूल्य असेल.

- सर्व प्रवाशांना एक वेळच्या जेवणाची व्यवस्था केली आहे.

रावसाहेब दानवे, प्रवीण दरेकर आणि नितेश राणे यांनी या गाडीला हिरवा झेंडा दाखवला. त्यानंतर फुग्यांनी सजलेली आणि गणरायाचा जयघोष करत गाडी दादर स्थानकातून सुटली. मात्र, यावेळी भाजप कार्यकर्त्यांची रेल्वे रूळांवर गर्दी दिसून आली. त्यामुळे सामायिक अंतरांच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे दिसून आले.

loading image
go to top