"मोदी सरकार घरातील वस्तू विकणाऱ्या दारुड्यासारखं..."

"मोदी सरकार घरातील वस्तू विकणाऱ्या दारुड्यासारखं..."

मुंबई : आर्थिक पडझडीवरचे लक्ष विचलीत करण्यासाठी संघ-भाजप देशात हिंसा पसरवत आहे. त्यासाठी विद्यापीठांना लक्ष करण्यात येत आहे. दिल्लीतील जेएनयु विद्यापीठात झालेला हल्ला त्या कटाचा पूर्वनियोजित भाग होता, असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी केला. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संघटना देशातला सर्वात मोठा आतंकवादी आहे, असे ते म्हणाले. 

मोदी सरकारला आर्थिक पातळीवर सर्वत्र अपयश आलेले आहे. दारुडा जसा घरातल्या वस्तु विकून गुजराण करतो, त्याच मार्गाने मोदी सरकार सार्वजनिक क्षेत्रातल्या एकएक कंपन्या विकून कारभार हाकत आहे. हे सर्व अपयश उघड होवू नये म्हणुन संघ-भाजपला देशात यादवी घडवायची आहे, असा आरोप आंबेडकर यांनी केला. 

जनसंघ, संघ आणि भाजप या संघटनांचा विस्तार हिंसेच्या मार्गाने

जनसंघ, संघ आणि भाजप या संघटनांचा विस्तार हिंसेच्या मार्गाने झालेला आहे. संघ, भाजप संघटनेत हिंसा अंगभूतच आहे, असे ते म्हणाले. तसेच जेएनयु मधील विद्यार्थ्यांचा लढा हा विद्यापीठ कॅंपसपुरता मर्यादीत नसून चातुवर्ण्यची प्रतिमागी पद्धत आणि भारतीय संविधानाची पुरोगामी व्यवस्था या दोन व्यवस्थेमधील तो संघर्ष असल्याचा दावा आंबेडकर यांनी केला. 

अकोला जिल्हा परिषदेचा अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी होणार असा दावा आंबेडकर यांनी केला. वाशिम जिल्हा परिषदेत धर्मनिरपेक्ष पक्षांना वंचित बहुजन आघाडी पाठिंबा देणार असल्याचे आंबेडकर म्हणाले. जनगणनेत ओबीसीची जातवार नोंद केली पाहिजे, त्याला पाठिंबा असल्याचे आंबेडकर म्हणाले. संघ विचाराचे कुलगुरु बदललेच पाहिजेत असे सांगून सत्ता कशी वापरायची हे सरकारला आम्ही शिकावयचे का, असा प्रश्न आंबेडकर यांनी केला. 

भाजप भितीचे वातावरण निर्माण करतोय

देशात संघ, भाजप भितीचे वातावरण निर्माण करत आहे. मात्र ही भिती झुगारुन आपण उभे राहिले पाहिजे. अर्बन नक्षलवादी संज्ञा संघ-भाजपने जन्माला घातली असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हाच देशातला सर्वात मोठा आंतकवादी आहे. कारण संघाकडुन कार्यकर्त्यांना शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण दिले जात असून हे सर्व पोलीस दफ्तरी नोंद आहे, असा दावा आंबेडकर यांनी केला. 

modi government is like drunk man who sales household things for survival says prakash ambedkar


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com