Palghar Crime : दारू पिऊन बापाने घातला धिंगाणा, अल्पवयीन मुलाने डोक्यात मुसळ घालून केलं बापाला ठार; पालघरमधील मोखाड्याची घटना!

Family Dispute : पालघरमधील मोखाडा तालुक्यात व्यसनी बापाला सोळा वर्षाच्या अल्पवयीन मुलाने डोक्यात मुसळ घालून ठार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना मोखाडा पोलीस ठाणे हद्दीमधील कुरलोद पैकी शेरीचा पाडा येथील आहे.
Alcohol-fueled argument ends in fatal attack by minor son

Alcohol-fueled argument ends in fatal attack by minor son

Sakal
Updated on

निखिल मेस्त्री

पालघर : गुरुवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास कौटुंबिक वाद आणि मारहाणीतून हा खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. शेरीचा पाडा येथे भगवान नवसू बर्तन (वय 45 वर्षे) आणि त्याचे कुटुंबीय राहत आहेत. भगवान हा गुरुवारी दहा वाजताच्या सुमारास दारू पिऊन घरात आला. त्यानंतर भगवान यांनी पत्नी सुनंदाशी भांडण सुरू केले. या भांडणाच्या वादातून भगवान यांनी सुनंदा आणि त्यांच्या भावंडांना मारहाण करायला सुरुवात केली. भगवान याचा सोळा वर्षी अल्पवयीन मुलगा हा भांडण सोडवण्यासाठी गेला होता. त्यावेळी वडील भगवान यांनी त्याचा गळा आवळला.

Alcohol-fueled argument ends in fatal attack by minor son
Sangli Crime News : सांगलीतून बाळाला उचललं अन् चिपळूणमध्ये एक लाख ८० हजारांना सौदा, पण माय लेकाच दोरी घट्ट होती...
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com