Money Laundering Case : अनिल देशमुखांना आणखी एक दिलासा; PA कुंदन शिंदे यांनाही मिळाला जामीन

मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने देशमुख यांचे पीए कुंदन शिंदेंना अटक केली होती.
 anil deshmukh
anil deshmukh esakal

Money Laundering Case : काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना 100 कोटींच्या कथित वसुलीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला होता. त्यानंतर आज पुन्हा अनिल देशमुख यांना दिलासा मिळाला आहे.

मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने देशमुख यांचे पीए कुंदन शिंदेंना अटक केली होती. त्यानंतर आज शिंदे यांना मुंबईतील विशेष पीएमएलए कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर शिंदे यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

 anil deshmukh
Gulmarg Avalanche : गुलमर्गमध्ये भीषण हिमस्खलन; दोन परदेशी नागरिकांचा मृत्यू

देशुमखांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या जामीनानंतर सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार देत कोर्टाने सीबीआयने दाखल केलेली जामीनाविरोधातील अपील फेटाळून लावले होते.

 anil deshmukh
MSME Budget 2023 : MSME साठी चांगली बातमी; केंद्राकडून 2 लाख कोटींच्या क्रेडिट हमी योजनेची घोषणा

नोव्हेंबर 2022 मध्ये मुंबईच्या विशेष न्यायालयाने अनिल देशमुखांचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर कनिष्ठ न्यायालयाच्या या निर्णयाला आव्हान देत देशमुखांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. येथे देशमुखांना जामीन मिळाला होता.

मुंबई उच्च न्यायालयाच्या या निर्णया विरोधात सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार देत ही मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आणि देशमुखांना जामीन मिळाला. त्यानंतर आता देशमुखांचे पीए शिंदे यांनादेखील जामीन मिळाला आहे.

 anil deshmukh
Budget 2023 : सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट; पंतप्रधान आवास योजनेच्या निधीत ६६ टक्क्यांनी वाढ

१०० कोटींच्या वसुलीचा आरोप असलेल्या देशमुख यांनी ईडीने अटक केली होती. जवळपास ११ महिने अनिल देशमुख यांनी तुरुंगात काढले. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने देशमुखांना १ लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला. नोव्हेंबर २०२१ पासून देशमुख तुरुंगात होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com