
मुंबई : गेल्या काही दिवसापासून राज्यभरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबईत देखील काल सायंकाळी गडगडाटी वादळे आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला. यामुळे मुंबईकरांना उष्णतेपासून दिलासा मिळाला. अशातच हा दिलासा आणखी दोन दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे नागरिकांनी छत्री घेऊनच घराबाहेर पडा, असे आवाहन करण्यात आले आहे.