ओ बापरे ! दररोज सापडणाऱ्या नव्या रुग्णांचा आज महाराष्ट्रात उच्चांंक ! आज वाढलेत इतके रुग्ण...

ओ बापरे ! दररोज सापडणाऱ्या नव्या रुग्णांचा आज महाराष्ट्रात उच्चांंक ! आज वाढलेत इतके रुग्ण...

मुंबई, ता. 23 : आज महाराष्ट्राने एका दिवसात सापडणाऱ्या नव्या रुग्णांचा  उच्चांंक  गाठला असून आज राज्यात विक्रमी 778 नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे राज्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या 6427 झाली आहे. तर आज 14 मृत्यूची नोंद झाली आहे. दरम्यान राज्यात आजपर्यंत एकूण 840 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

आज राज्यात 14 करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई  येथील 6, 5 पुणे येथे, नवी मुंबई येथे 1, नंदूरबार येथे 1 आणि धुळे मनपा येथे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी 8 पुरुष तर 6 महिला आहेत. आज झालेल्या 14 मृत्यूपैकी 60 वर्षे किंवा त्यावरील 2  रुग्ण आहेत तर 9  रुग्ण हे वय वर्षे 40 ते 59 या वयोगटातील आहेत तर 3 रुग्ण 40 वर्षांखालील आहे. दोन रुग्णांबाबत इतर आजाराची माहिती अद्याप मिळू शकली नाही उर्वरित 12 मृत्यूंपैकी 7 रुग्णांमध्ये ( 58%) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोविड 19 मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 283 झाली आहे. 

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या 477 कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण 7491 सर्वेक्षण पथकांनी  काम केले असून त्यांनी 27.26 लाख  लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.  

आज राज्यातून 840 रुग्णांना ते बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात 1,14,398 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 8702 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

मुंबईतही आकडा मोठाच : 

मुंबईत आज दिवसभरात 478 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेत. यातील 297 रुग्णांची चाचणी 20 आणि 21 एप्रिलला करण्यात आली होती. आज त्यांचा पॉझिटिव्ह असा रिपोर्ट आलाय. 

more than 700 covid 19 positive patients detected in maharashtra read full story 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com