महिनाभरात सव्वा लाखांपेक्षा जास्त मद्यसेवन परवाने मंजूर, होम डिलीव्हरी सेवेचा 35 लाख मद्यप्रेमींनी घेतला फायदा

महिनाभरात सव्वा लाखांपेक्षा जास्त मद्यसेवन परवाने मंजूर, होम डिलीव्हरी सेवेचा 35 लाख मद्यप्रेमींनी घेतला फायदा
Updated on

मुंबई : लॉकडाऊन काळात राज्यात घरपोच मद्यविक्रीला चांगला प्रतिसाद मिळाला असून, या काळात 35 लाख लोकांनी या सेवेचा लाभ घेतला. या दरम्यान अवैध मद्यविक्रीचे साडे अकरा हजार गुन्हे दाखल झाले. तर 30 कोटीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

राज्यात 15 मे पासून उत्पादन शुल्क विभागाने घरपोच मद्यविक्री सेवेसाठी परवानगी दिली होती. 17 जुलैपर्यंत राज्यात एकुण 35,78,021 परवाना धारकांना घरपोच सेवा मिळाली आहे. एकट्या 16 जुलै रोजी 55,456 ग्राहकांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. त्यापैकी मुंबई शहर आणि उपनगरातील 31,338 ग्राहकांचा समावेश आहे. उत्पादन शुल्क विभागाने प्रसिध्दीपत्राद्वारे ही माहिती दिली आहे.

या काळात ग्राहकांना ऑनलाईन मद्य सेवनाच्या परवान्यासाठी मोठ्या प्रमाणात अर्ज केले. एप्रिल ते 30 जून या कालावधीत राज्यात एकु  1,43,656 व्यक्तींनी ऑनलाईन अर्ज केले. त्यापैकी 1,38,497 व्यक्तींचे परवाने मंजूर करण्यात आले. उर्वरीत अर्जावर अजूनही कारवाई सुरु आहे. या दरम्यान ऑफलाईन पध्दतीनेही परवाने देण्याचे काम सुरु आहे. याबाबत उत्पादन शुल्क विभागाने माहिती दिली आहे. 

लॉकडाऊन काळात परराज्यातून अवैध मद्य तस्करी रोखण्यासाठी 12 सीमा तपासणी नाक्यांवर तपासणी सुरु होती. 24 मार्च पासून ते 17 जुलै या लॉकडाऊन काळात संपुर्ण राज्यात अवैध मद्यविक्रीचे 11,455 गुन्हे नोंदवले गेले आहे. तर 5,723 आरोपींना अटक करण्यात आली आहे. मद्यविक्रीसाठी वापरलेले 997 वाहने जप्त करण्यात आले आहेत. 30.10 कोटी रुपयाचा मुद्देमाल जप्त केला गेला आहे.

राज्यात वाईन शॉप चालकांना पुढील आदेशापर्यंत घाऊक विक्रेत्यांकडून नवीन मद्यसाठा खरेदी करुन सीलबंद बाटलीमध्ये विकण्याची परवानगी देण्यात आली आहे. यामुळे राज्यातील सुमारे 15,200 देशी दुकानं, वाईन शॉप, बिअर शॉप्स चालक आणि त्यावर अवलंबून असलेल्या 1 लाख मनुष्यबळाला मोठा दिलासा मिळणार असल्याचेही उत्पादन शुल्क विभागाने म्हटले आहे.

मद्यसेवन परवाना शुल्क  : 

एक वर्ष मद्यसेवनाच्या परवान्यासाठी 100 रुपये तर आजीवन मद्यसेवन परवान्याकरीता 1000 रुपये शुल्क आहे. 

अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक व विक्री विरुद्ध तक्रार स्वीकारण्याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागाचा नियंत्रण कक्ष 24 तास सुरू आहे. त्यावर तक्रारदार आपली तक्रार नोंदवू शकतात. तक्रार करणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल असं  राज्य उत्पादन शुल्क विभाग आयुक्त कांतीलाल उमप यांनी सांगितलंय. 

तक्रार नोंदवण्यासाठी कुठे संपर्क कराल : 

  • टोल फ्री क्रमांक -  १८००८३३३३३३ 
  • WhatsApp क्रमांक - ८४२२००११३३.
  • ई-मेल - commstateexcise@gmail.com आहे.

( संकलन - सुमित बागुल )

more than one lac twenty five liquor licences issued read full news

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com