esakal | मुंबईत बरे होणारे रुग्ण अधिक
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai

मुंबईत बरे होणारे रुग्ण अधिक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : आज नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक दिसली. 514 नवीन रुग्णांची नोंद झाली. कोरोना (Corona) बाधित रुग्णांची एकूण संख्या 7,36,284 वर पोहोचली आहे. दरम्यान, दिवसभरात 604 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत 7,13,174 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

बरे झालेल्या रूग्णांचा दर 97 टक्के असून कोविड वाढीचा दर 0.06 टक्के आहे.मुंबईतील रूग्ण दुपटीचा कालावधी 1277 दिवस आहे.आज दिवसभरात 29,886 कोविड चाचण्या झाल्या असून त्यापैकी 514 जण पॉझिटिव्ह सापडले आहेत. त्यामुळे पॉझिटिव्हीटी दर 1.71 टक्क्यांवर पोहोचला आहे. आतापर्यंत 97,99,839 एवढ्या चाचण्या झाल्या आहेत. मुंबईत सध्या 4602 सक्रिय रुग्ण आहेत.आज 4 कोविड मृत्यूची नोंद झाली असून मृतांचा एकूण आकडा 16,037 वर पोचला आहे.

हेही वाचा: गणेशोत्सवानंतर दररोज 60,000 कोविड चाचण्यांचे पालिकेचे लक्ष्य

धारावीत शून्य रुग्णांची नोंद

धारावीत आज पुन्हा एकदा शून्य रुग्णांची नोंद झाली. धारावी मध्ये एक ही रुग्ण न सापडण्याची आज 18 वी वेळ आहे.तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर धारावीतील परिस्थिती नियंत्रणात आल्याने समाधान व्यक्त होत आहे. धारावीतील एकूण रुग्णसंख्या 7058 इतकी आहे. सक्रिय रुग्णांची संख्या केवळ 10 असून आतापर्यंत 6631 रुग्ण बरे झाले आहेत.आज माहीम मध्ये केवळ 4 तर दादर मध्ये 3 रुग्ण सापडले. जी उत्तरमध्ये 7 रुग्ण सापडले असून बाधित रुग्णांची संख्या 27,638 इतकी आहे.

loading image
go to top