

Maharashtra Child Assult Case
ESakal
नितीन बिनेकर
मुंबई : पुणे जिल्ह्यातील नसरापूर आणि म्हाळुंगे येथील चिमुकल्यांवरील अत्याचार व हत्यांच्या धक्कादायक घटनांनी संपूर्ण राज्याला हादरवले आहे. या घटनांनी केवळ वेदना निर्माण केल्या नाहीत, तर आपल्या मुलांची सुरक्षितता किती धोक्यात आहे, हा कठोर प्रश्नही समाजासमोर उभा केला आहे. बालसुरक्षा ही केवळ कुटुंबापुरती मर्यादित नसून समाजाच्या एकत्रित जबाबदारीचा विषय बनला आहे.