27 नोव्हेंबर अवयवदान दिन : मरावे परि, अवयव रुपी उरावे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai

27 नोव्हेंबर अवयवदान दिन : मरावे परि, अवयव रुपी उरावे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मरावे परि,अवयव रुपी उरावे.  अवयव दानाचा संकल्प करुन आपण मृत्युनंतरही समाजाला अत्यंत उपयोगी ठरेल असे कार्य करु शकतो.  27 नोव्हेंबरच्या राष्ट्रीय अवयव-दान दिनानिमित्त महानगरपालिकेच्या प्रमुख रुग्णालयांमध्ये जाऊन अवयव-दान नोंदणी करावी. अवयव-दान नोंदणी केल्यावर त्याबाबतची माहिती आपले जवळचे नातेवाईक आणि मित्र यांना सांगावी, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या के. ई. एम. रुग्णालयांचे अधिष्ठाता व ‘रिजनल कम स्टेट ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन’ (रोटो-सोटो) केंद्राचे अध्यक्ष डॉ. हेमंत देशमुख यांनी केले आहे.

तसेच नोंदणी केल्यावर प्राप्त होणारे 'डोनर कार्ड' शक्य असल्यास आपल्या इन्स्टाग्राम, ट्वीटर, फेसबुक, व्हॉट्स-अप इत्यादी 'सोशल मिडिया अकाउंट' वर अपलोड करावे, जेणेकरून आपल्या अवयव दाता नोंदणीची माहिती आपल्या लोकांपर्यंत पोहोचेल आणि एका सकारात्मक कार्याबाबत जनजागृती देखील साध्य होऊ शकेल, असेही आजच्या अवयव-दान दिनाच्या निमित्ताने सांगण्यात आले आहे.

Mumbai

Mumbai

हेही वाचा: मुंबईत ४.७५ लाख लाभार्थ्यांनी चुकवला दुसरा डोस; वाचा सविस्तर माहिती

रोटो-सोटोच्या महाराष्ट्र राज्य व पश्चिम विभागाच्या केंद्र संचालक डॉ. सुजाता पटवर्धन यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात आतापर्यंत सुमारे 20 हजार दात्यांनी अवयव दानासाठी नोंदणी केलेली आहे. तर , या केंद्राच्या समन्वयातून सन – 2017 पासून आतापर्यंत 580 मेंदू मृत दात्यांद्वारे 780 व्यक्तिंना मूत्रपिंड, 480 व्यक्तिंना यकृत, 130 व्यक्तिंना हृदय, 43 व्यक्तिंना फुप्फुसे , 6 व्यक्तिंना स्वादुपिंड , 3 व्यक्तिंना आतडे  तर 4 हात दान करण्यात आले आहेत. याचाच अर्थ 580 मेंदू मृत दात्यांद्वारे सुमारे १ हजार 475 व्यक्तिंना अवयव-दान करण्यात आले आहे.  580 मेंदू मृत दात्यांपैकी 242 दाते हे मुंबईतील आहेत. या 242 दात्यांद्वारे 2017 पासून 319 व्यक्तिंना मूत्रपिंड ,185 व्यक्तिंना यकृत ,67 व्यक्तिंना हृदय , 26  व्यक्तिंना फुप्फुसे , 6 व्यक्तिंना स्वादुपिंड , एका व्यक्तिला आतडे आणि एका व्यक्तिला दुहेरी हात दान करण्यात आला आहे. म्हणजेच 242 मेंदू मृत दात्यांद्वारे सुमारे 605 व्यक्तिंना अवयव-दान करण्यात आले आहेत, अशीही माहिती डॉ. पटवर्धन यांनी या दिली आहे.

हेही वाचा: नाशिक : राज्य महिला आयोगाने मागवला कौमार्य चाचणी प्रकरणी अहवाल

6 हजारांहून अधिक प्रतिक्षा यादी -      

तसेच अवयव दानासंबंधीच्या प्रतिक्षा यादीवर साधारणपणे 6,748 गरजूंची नोंदणी आहे. यामध्ये प्रामुख्याने 5,374 मूत्रपिंड (किडनी), 1194 यकृत , 101 हृदय, 21 फुफ्फुसे , ५३ स्वादुपिंड व 5 आतडे यासाठीच्या गरजूंचा समावेश आहे.

राज्यातील पश्चिम विभागाच्या या केंद्राद्वारे ऑक्टोबर 2020 ते सप्टेंबर 2021 या कालावधीत महाराष्ट्रात 88 मेंदू मृत अवयव दात्यांद्वारे एकूण 244 अवयवांचे दान करण्यात आले आहे. या उल्लेखनीय कामगिरीसाठी महाराष्ट्र व पश्चिम विभागीय केंद्राचा गौरव करण्यात येणार आहे.

loading image
go to top