रुग्णालयाकडून ५ दिवसांनी कुजलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह..कोरोनाबाधित नसूनही रुग्णालय प्रशासनाचं दुर्लक्ष

mortal body
mortal body

मुंबई: राज्यात कोरोनानं थैमान घातलं आहे. कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. मुंबईत कोरोनाचा सर्वाधिक कहर पाहायला मिऴतोय. याच दरम्यान एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

मुंबईत एका कोरोना नसणाऱ्या व्यक्तिचा मृत्यू झाला आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या मृतदेहांसोबतच या कोरोना नसणाऱ्या व्यक्तिच्या मृतदेहाचीही विटंबना झाल्याची घटना घडली आहे. तब्बल ५ दिवसानंतर या व्यक्तिचा मृतदेह त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. यावेळी हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत मिळाला आहे. 

नेमकी काय आहे घटना ? 

लॉकडाऊनमुळे भाईंदर येथे राहणारे हरिश्चंद्र शंकरलाल जांगीर (वय-४५) हे वसईला जाऊन राजस्थानला जाणारी रेल्वे ट्रेन पकडणार होते. त्यासाठी ते मीरा-भाईंदरहून चालत निघाले होते. ट्रेन पकडण्याच्या नादात त्यांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला. या मृताच्या नातेवाईकांना त्यांचा मृतदेह मिळवण्यासाठी तब्बल पाच दिवस लागले. दरम्यान सर्वात धक्कादायक म्हणजे जांगीर यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत नातेवाईकांना मिळाला. पाच दिवसानंतर जांगीर यांचा कुजलेला मृतदेह राजस्थानला घेऊन जाण्यास नातेवाईकांना प्रशासनानं परवानी दिली.

ही घटना १४ मे रोजी घटना घडली. आर्थिक संकटात सापडलेले हरिश्चंद्र जांगीर आपल्या गावी राजस्थानात जाण्यासाठी मीरा-भाईंदरहून चालत वसईला निघाले. वसईवरून राजस्थानला ट्रेन जाणार असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. खिशात पैसे नसल्यानं त्यांनी उपाशी पोटी भाईंदर ते वसई असा पायी प्रवास सुरु केला. वसईत पोहोचल्यानंतर त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. 

जांगीर यांचं एकही नातेवाईक जवळ राहत नसल्यानं त्यांचा मृतदेह विरार पश्चिम येथील शीत शवागृहात ठेवला गेला. परंतू, त्या शीतगृहाचे तापमान आवश्यकतेनुसार नसल्याने हरिश्चंद्र यांचा मृतदेह कुजण्यास सुरुवात झाल्याचं सांगितलं जात आहे. 

१४ मे रोजी घडलेल्या घटनेनंतर हरिश्चंद्र यांचे भाऊ जयप्रकाश जांगीर हे १७ मे रोजी विरारमध्ये दाखल झाले. त्यानंतर त्यांनी शीतशवागृहात जाऊन पाहिलं तर धक्कादायक बाब त्यांच्या लक्षात आली. त्या शीतगृहातील वातानुकूलित यंत्रणा नियमित काम करत नसल्याचं त्यांना समजलं. शीतगृहातील तापमान ५ ते ६ अंश सेल्सियस असणं आवश्यक असताना त्याचे तापमान १८ अंश सेल्सियस होते. यामुळे मृतदेह कुजण्यास सुरुवात झाली होती.

तर महापालिकेनं कोरोना व्हायरसच्या तपासणीसाठी नमुने २ दिवसांनी घेतले. त्यामुळे मृतदेह ताब्यात घेण्यास आणखीनच उशीर झाला. चाचणीचा अहवाल आल्याशिवाय मृतदेह ताब्यात देण्यात येणार नसल्याचं महापालिकेनं त्यांच्या भावाला सांगितलं. दरम्यान विरारमध्येच मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची सक्तीही करण्यात आल्याचा आरोपही जयप्रकाश जांगीर यांनी केला आहे. 

गावीच अंत्यसंस्कार करायचे असल्यानं कोविड १९ तपासणी अहवाल नकारात्मक आल्यानं त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडून मृतदेह राजस्थानला घेऊन जाण्याची परवानगी घेतली. अखेर मंगळवारी रुग्णवाहिकेनं हरिश्चंद्र जांगीर यांचा मृतदेह घेऊन त्यांचा भाऊ जयप्रकाश जांगीर राजस्थानकडे रवाना झाले.

mortal body of a man given by hospital after 5 days read full strory

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com