सर्वाधिक कोरोना मृत्यू अंधेरी आणि जोगेश्‍वरीत; परंतु रुग्णवाढ दुप्पट होण्याचा कालावधी दिलासादायक

समीर सुर्वे
Saturday, 17 October 2020

बोरिवली आर मध्य प्रभागातील रुग्णसंख्या शुक्रवारपर्यंत 15 हजार 910 पर्यंत पोहचली असून आतापर्यंत 421 जणांचा मृत्यू झाला आहे

मुंबई : बोरिवली आर मध्य प्रभागातील रुग्णसंख्या शुक्रवारपर्यंत 15 हजार 910 पर्यंत पोहचली असून आतापर्यंत 421 जणांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक 646 मृत्यू अंधेरी आणि जोगेश्‍वरी के पूर्व प्रभागातील आहेत. समाधानकारक बाब म्हणजे, आता मुंबईतील एकाही प्रभागात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 60 दिवसांपेक्षा कमी नाही.  

दसऱ्यापासून जिम, व्यायामशाळा सुरु करण्यास मान्यता - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

बोरिवली प्रभागात आतापर्यंत शहरातील 7 टक्के रुग्ण आढळले आहेत. गेल्या आठवड्यापर्यंत या प्रभागातील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 60 दिवसांच्या आत होता. आता तो 62 दिवसांवर पोहचला आहे. सर्वात कमी कालावधी दहिसर आर उत्तर प्रभागात आहे. या प्रभागात 60 दिवसांत रुग्ण दुप्पट होत आहेत. कांदिवली आर उत्तर प्रभागातही रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 60 दिवसांचा आहे. आर उत्तरमध्ये 7 हजार 72 रुग्ण आढळले आहेत. कांदिवली मध्ये 13 हजार 102 रुग्ण आढळले आहेत. 
मुंबईत शुक्रवारपर्यंत 2 लाख 27 हजार 806 रुग्ण आढळले आहेत. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 82 दिवसांवर पोहचला आहे. 

 

भारताची ऐश्‍वर्या श्रीधर "वाईल्ड लाईफ फोटोग्राफर ऑफ द ईयर' 

उशिरा नोंदीमुळे रुग्णवाढीचा वेग वाढला 
मुलुंड टी प्रभागातील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 53-54 दिवसांपर्यंत खाली आला होता. शुक्रवारी त्याचा कालावधी 81 दिवसांवर पोहचला. काही रुग्णांची नोंद तांत्रिक कारणामुळे राहिली होती. त्या नोंदी गेल्या काही दिवसांत करण्यात आल्या. त्यामुळे रुग्णवाढीचा वेग वाढल्याचे दिसत होते. या रुग्णांचे उपचारही पूर्ण झाले होते, असे टी विभागाचे सहायक आयुक्त किशोर गांधी यांनी सांगितले. 
------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Most corona deaths in Andheri and Jogeshwari