दिलासादायक बातमी! मुंबई, पुणे, मालेगाव सारख्या हॉटस्पॉटमधील सर्वाधिक कोरोनाबाधित बरे

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 17 May 2020

कोरोनाचे रूग्ण बरे होण्याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.  राज्यात बरे झालेल्या एकूण रुग्णांच्या निम्मे रुग्ण या एका आठवड्यात बरे झाले आहेत.

मुंबई : कोरोनाचे रूग्ण बरे होण्याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात बरे झालेल्या एकूण रुग्णांच्या निम्मे रुग्ण या एका आठवड्यात बरे झाले आहेत. आज आतापर्यंत सर्वाधिक 600 हून अधिक रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या सुमारे 7688 एवढी झाली आहे. विशेष म्हणजे बरे होणारे सर्वाधिक रुग्ण हे मुंबई, पुणे, नाशिक, मालेगाव या भागातील आहेत.

मोठी बातमी : ठरलं तर! महाराष्ट्रात उद्यापासून लॉकडाऊन-४ सुरु होणार..वाचा काय असेल सुरु आणि काय बंद 

केंद्र शासनाने सुमारे एक आठवड्यापूर्वी कोरोना रुग्णांना डिस्चार्ज देण्याबाबत सुधारित धोरण जाहिर केले होते. त्यानुसार कुठलीही लक्षणे नसलेल्या रुग्णांना 14 दिवसांऐवजी दहाव्या दिवशी घरी सोडण्यात येत आहे. यामुळे बरे झालेल्या रूग्णांची संख्या देखील वाढली आहे. रविवार दिनांक 10 मे रोजी 399 रुग्णांना घरी सोडण्यात आले होते. त्यानंतर 11 मे रोजी 587, 12 मे रोजी 339,  13 मे रोजी 422, 14 मे रोजी 512, 15 मे रोजी 505, 16 मे रोजी 524 आणि आज 17 मे रोजी 600 हून अधिक रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. अशा प्रकारे या एका आठवड्यामध्ये 3700 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. राज्यात आजपर्यंत 7688 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत त्यातील 50 टक्के रूग्ण हे 10 ते 17 मे या कालावधीतील आहेत.  

हे ही वाचा : एका ट्विटमुळे रेल्वेनं रुग्णासाठी मुंबईहून घरपोच पाठवली 'ही' गोष्ट.. सोलापूरचा कर्करुग्ण गेला भारावून 

साधारणत: मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून बरे झालेल्या कोरोनाबाधीत रुग्णांना घरी सोडले जात आहे. मार्चमध्ये दोन अंकी असलेली ही संख्या एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून तीन अंकी झाली.

Most hotspots in hotspots like Mumbai, Pune, Malegaon, read detail story


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Most hotspots in hotspots like Mumbai, Pune, Malegaon, read detail story