
मुंबई : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) देशभरातील आपल्या सर्व शाळांमध्ये भाषा शिक्षणविषयक धोरण जारी केले आहे. त्यानुसार सीबीएसई शाळांमध्ये पायाभूत स्तरापासून मातृभाषा किंवा राज्यभाषा शिकविणे अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्यातील सीबीएसई शाळांमध्ये मराठी भाषा शिकवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.