आज ठाकरे सरकार देणार शेतकऱ्यांना गिफ्ट...

सकाळ वृत्तसेवा
Monday, 24 February 2020

मुंबई : आजपासून विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालंय. मात्र त्यापूर्वीच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची घोषणा केली आहे. कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांच्या नावांची पहिली यादी आज जाहीर होणार आहे अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केली आहे.

मुंबई : आजपासून विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालंय. मात्र त्यापूर्वीच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची घोषणा केली आहे. कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांच्या नावांची पहिली यादी आज जाहीर होणार आहे अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केली आहे.

या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी मंत्री मंडळाची बैठक घेण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अन्य मंत्रीही उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून ही घोषणा करण्यात आली. तसंच या अर्थसंकल्पीय अधिवेशनात एकूण ६ अध्यादेश आणि १३ विधेयक मांडले जाणार आहेत. 

मोठी बातमी - चंद्रकांत पाटील यांच्या 'पीएचडी'वर; शरद पवारांचं जबरदस्त उत्तर..

महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेचा प्रत्यक्ष लाभ आजपासून शेतकऱ्यांना मिळणार आहे. या यादीत प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येकी २ गावांच्या काही शेतकऱ्यांच्या कर्जामाफीची घोषणा आज होणार आहे. तसंच कर्जमाफीची दुसरी यादी २८ फेब्रुवारीला जाहीर करण्यात येणार आहे. एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत संपूर्ण राज्याच्या शेकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे, असं मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.

आमच्यात मतभेद नाहीत:

"महाविकास आघाडीमध्ये कोणत्याही प्रकारचे मतभेद नाहीत, आम्ही एल्गार परिषदेची चौकशी केंद्राकडे दिलेली नाही. केंद्रानं याबाबतीत पोलिसांवरचं अविश्वास दाखवला आहे. सिएए आणि एनआरसी या दोन्ही विषयांवर कॉँग्रेससोबत चर्चा करूनच निर्णय घेतला आहे. तसंच एनपीआरबाबत एक समिती स्थापन केली जाणार आहे" असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हंटलं आहे.

मोठी बातमी - 'माझ्या अमूल ताकत बुरशी', टिटवाळ्याच्या ग्राहकाची तक्रार...

तत्पूर्वी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर रविवार चहापानाचा कार्यक्रम पार पडला मात्र नेहमीप्रमाणे विरोधकांनी या कार्यक्रमाचा बहिष्कार केला. "चहाचं निमंत्रण एकमेकांमधले संबंध दृढ करण्यासाठी असतं मात्र कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेला त्यांच्यातलेच संबंध दृढ करण्याची जास्त गरज आहे." असं माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटलं आहे.  

uddhav thackeray will share list of farmers who will get farmers loan wavier  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: uddhav thackeray will share list of farmers who will get farmers loan wavier