esakal | खासदार डाँ श्रीकांत शिंदे यांच्या कडून 'खारेगाव फाटक उड्डाण पुलाची' पाहणी,
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

खासदार डाँ श्रीकांत शिंदे यांच्या कडून 'खारेगाव फाटक उड्डाण पुलाची' पाहणी,

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कळवा : कल्याणचे शिवसेनेचे (Shivsena) खासदार (MP) डाँ श्रीकांत शिंदे ( Shrikant Shinde) यांनी शनिवार (Saturday) ला खारेगाव (Kharegaon) रेल्वे फाटक उड्डाण पुलाची पाहणी केली. खारेगाव (Kharegaon) मधून कळवा पूर्वेला जाण्यासाठी पूल नसल्याने येथील नागरिकांना जाण्या येण्यासाठी खारेगाव रेल्वे (Railway) ओलांडून जावे लागते लोकल येण्याआधी फाटक बंद केल्यावर अनेक वाहनांचा खोळंबा होत आहे तसेच रुळ ओलांडताना आता पर्यंत अनेक नागरिकांचा बळी गेला आहे.

वाहनचलकांची व नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे फाटकावर ठाणे महापालिका व मध्ये रेल्वेच्या वतीने उड्डाणपुल उभारण्याचे काम गेल्या तीन वर्षांपासून सुरू असून ते अतिशय संथगतीने सुरू असल्याने नागरिक व वाहनचालक यांची सध्या फरफट सुरू आहे त्यामुळे सोशल मीडियावर रेल्वे व महापालिकेच्या कामावर सध्या टीका सुरू आहे हे काम पूर्ण झाल्यावर रेल्वेची क्रॉसिंग बंद होऊन कल्याण व ठाण्याकडे जाणाऱ्या लोकलचा खोळंबा दूर होणार आहे.

रेल्वेचा प्रवास जलद होऊन रेल्वेच्या फेऱ्यामध्ये वाढ होणार असल्याने या पुलाचे काम लवकर पूर्ण होऊन येथील नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी खासदार शिंदे यांनी शनिवारी या कामाची पाहणी केली.या वेळी महापौर नरेश म्हस्के,स्थानिक नगरसेवक उमेश पाटील,अनिता गौरी,मनोज लासे,मंगला कलंबे, व रेल्वेचे अधिकारी, उपस्थित होते या वेळी खासदारांनी हे काम लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या तसेच या वेळी खासदार शिंदे यांनी कळवा व मुंब्रा दरम्यान मध्ये रेल्वेच्या वतीने टाकण्यात येत असलेल्या पाचव्या व सहाव्या मार्गीकेच्या कामाचीही पाहणी केली.

हेही वाचा: 'सुखकर्ता दु:खहर्ता' म्हणत चाकरमान्यांचा 'मोदी एक्स्प्रेस' मधून प्रवास सुरू

या उड्डाणपुलाचे काम शेवटच्या टप्प्यात सुरू असून येत्या दीड महिन्यात हे काम पूर्ण होऊन तो वाहतुकीसाठी खुला होईल"

- डाँ श्रीकांत शिंदे,खासदार कल्याण,

loading image
go to top