Congress
मुंबई : ‘मुंबईतील प्रदूषण अत्यंत वाईट पातळीवर गेले असून श्वसनाचे आजार वाढत आहेत. मुंबईकरांना स्वच्छ हवाही मिळत नाही. मुंबईची हवा विषारी होणे हा निसर्गाचा दोष नाही तर भ्रष्ट, बेजबाबदार आणि संधीसाधू सरकारचे दुर्लक्ष, निष्काळजी आणि प्रयत्नांच्या अभावाचा परिणाम आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेत काँग्रेस सत्तेत आल्यावर मुंबईकरांच्या श्वासाचा हक्क आम्ही पहिल्याच दिवशी सुरक्षित करू,’ अशी ग्वाही मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी दिली.