MPSC Paper Leak: पेपरफुटीप्रकरणी सरकारचा मोठा निर्णय; एमपीएससीच्या संबंधित परीक्षांची एसआयटी चौकशी, मुलाखतींना स्थगिती

MPSC Exams Face SIT Probe After Paper Leak Case: एमपीएससी औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणात अटक अधिकाऱ्यांच्या कार्यकाळातील सर्व परीक्षा एसआयटीमार्फत तपासल्या जाणार, संशयित सर्व भरती प्रक्रियांवरील मुलाखती पुढील आदेशापर्यंत थांबविण्याचा निर्णय
MPSC Exam Paper Leak Case SIT Probe Ordered Into Related Exams as Government Puts Interviews on Hold Amid Complaints

MPSC Exam Paper Leak Case SIT Probe Ordered Into Related Exams as Government Puts Interviews on Hold Amid Complaints

sakal

Updated on

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) वतीने घेण्यात आलेल्या औषध निरीक्षकपदाच्या परीक्षेतील पेपरफुटीप्रकरणी अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांच्या कार्यकाळातील परीक्षांची ‘एसआयटी’नेमून चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली.  ‘याशिवाय ज्या परीक्षांच्या संदर्भात विद्यार्थ्यांच्या  तक्रारी असतील, अशा परीक्षांची  फेरतपासणी केली जाईल.  तोपर्यंत त्यांच्या  मुलाखती थांबविण्यात येतील,’ असे आश्वासन त्यांनी दिले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com