

Railway Station Elevated Deck
ESakal
मुंबई : दादर पश्चिम रेल्वे स्थानकावरील प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी आणि प्लॅटफॉर्ममधील वाहतूक सुलभ करण्यासाठी, मुंबई रेल्वे विकास महामंडळ (MRVC) आणि पश्चिम रेल्वे संयुक्तपणे सर्व पादचारी पुलांना जोडणारा एक मोठा एलिव्हेटेड डेक बांधत आहेत. दादर स्थानकावरून दररोज अंदाजे २-३ लाख प्रवाशांची वाहतूक होते. प्लॅटफॉर्म कनेक्टिव्हिटी मजबूत करणे हे रेल्वेचे प्राधान्य बनले आहे.