

Aamne South Mumbai Link Road
ESakal
मुंबई : समृद्धी महामार्गावरून येणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुकर आणि सुसाट होण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. समृद्धी महामार्गावरून १६.६९ किमी लांबीच्या नवीन जोड रस्त्याची आखणी निश्चित करण्यात आली आहे. यामुळे आमणेहून दक्षिण मुंबई प्रवास वाहतूक कोंडीमुक्त होणार असून अवघ्या १ तासात पोहोचणे शक्य होणार आहे.