

MSRDC Plans Helicopter Airlift for Critical Accident Victims on Samruddhi Mahamarg and Mumbai Pune Expressway
sakal
मुंबई: समृद्धी महामार्गासह मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या मार्गावर अपघात झाल्यास गंभीर जखमींना तत्काळ रुग्णालयात दाखल करता यावे, यासाठी ‘एअरलिफ्ट’ची सुविधा उपलब्ध करून देण्याचा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचा (एमएसआरडीसी) विचार आहे. त्यानुसार दोन्ही मार्गांवर निवडक ठिकाणी हेलिकॉप्टर तैनात ठेवता येईल का, याबाबत ‘एमएसआरडीसी’ अभ्यास करीत आहे.