राज्य परिवहन महामंडळाच्या 'त्या' ट्विटर, इन्स्टाग्राम अकाऊंटबद्दल महामंडळाने केला खुलासा; वाचा सविस्तर...

प्रशांत कांबळे
मंगळवार, 14 जुलै 2020

लालपरीवर प्रेम करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांकडून सोशल मीडियावर विविध अकाऊंट तयार करताना दिसून येत आहे. त्याप्रमाणे काही दिवसांपूर्वी एसटी महामंडळाच्या नावावर (एमएसआरटीसी) ट्विटर आणि इंन्स्टाग्राम अकाऊंट सोशल मीडियावर सुरू करण्यात आले होते.

मुंबई : झटपट बातम्या, माहिती आणि तक्रारीच्या युगात आता सोशल मीडियाला फार महत्व आहे. रेल्वेच्या ट्विटर, इन्स्टाग्राम, फेसबूक अशा अकाऊंट वरून रेल्वेच्या सकारात्मक कामाच्या प्रसिद्धीचे सुद्धा काम केले जाते. त्यामुळे प्रवाशांशी संबंध येणाऱ्या विभागांमध्ये नागरिकांशी संपर्क करण्यासाठी, सूचना, तक्रारी ऐकूण घेण्यासाठी अशा माध्यमांचा वापर केला जातो.  मात्र, एसटी महामंडळात अद्याप अशा प्रकारच्या सोशल मीडियाची वानवा असल्याचे दिसून येत आहे. 

'डीसीजीआय'च्या कठोर नियमावलीमुळे प्लाझ्मा दानाला अत्यल्प प्रतिसाद; जाणून घ्या नियमावली...

त्यामुळे लालपरीवर प्रेम करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांकडून सोशल मीडियावर विविध अकाऊंट तयार करताना दिसून येत आहे. त्याप्रमाणे काही दिवसांपूर्वी एसटी महामंडळाच्या नावावर (एमएसआरटीसी) ट्विटर आणि इंन्स्टाग्राम अकाऊंट सोशल मीडियावर सुरू करण्यात आले होते. ते अधिकृत असल्याचा समज झाल्याने अनेकांनी त्याला लाईक करणे, फॉलो करणे सुरू केले होते. मात्र, हे अकाऊंट फेक असल्याचे एसटी महामंडळाने स्पष्ट केले आहे. बनावट अकाऊंटला शोधून त्यांच्यावर सायबर कायद्यांतर्गत कारवाई करणार असल्याचे एसटी महामडंळाने सांगितले आहे. 

ऐन लॉकडाऊनमध्ये सिडकोने उगारला कारवाईचा बडगा; आमदार म्हात्रेंनी केली कारवाई थांबवण्याची मागणी...

अधिकृत अकाऊंट्स सुरू करण्याच्या सूचना
एसटीचे प्रवाशांच्या तक्रारी किंवा सूचना एसटी महामंडळापर्यंत पोहचत नसल्याने, प्रवाशांशी संपर्क करता यावा म्हणून राज्य परिवहन मंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी एसटी महामंडळाचे अधिकृत ट्विटर आणि इतरही सोशल मीडियाचे अकाऊंट सुरू करण्याचे निर्देश दिले आहे. 

लोकलमधील अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी पश्चिम रेल्वेने आखली 'ही' योजना

एसटी महांडळाचे  सोशल मीडियावर कोणतेही अधिकृत अकाऊंट नाही. महामंडळाच्या नावाने बनावट अकाऊंट असल्यास त्याची माहिती घेऊन त्यांच्यावर सायबर कायद्यांतर्गत योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे. 
- अभिजीत भोसले, सहाय्यक जनसंपर्क अधिकारी, एसटी महामंडळ

---
संपादन : ऋषिराज तायडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MSRTC clarifies over the social media accounts which goes viral