esakal | लोकलमधील अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी पश्चिम रेल्वेने आखली 'ही' योजना
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai-local.

सर्व काही पूर्वपदावर आणत असताना पुन्हा कोरोनाची साथ पसरु नये, यासाठी उपनगरी रेल्वेतील प्रवाशांवर मर्यादा आणण्यात आली आहे. त्यासाठी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच लोकल सुरु करण्यात आली. मात्र इतर लोकही लोकलने प्रवास  करत असल्याचे दिसून आले.

लोकलमधील अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी पश्चिम रेल्वेने आखली 'ही' योजना

sakal_logo
By
संजय घारपुरे

मुंबई : लॉकडाऊननंतर सुरु झालेल्या अनलॉकमध्ये अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यासाठी रेल्वेने मुंबईतील लोकल सेवा सुरु केली. सर्व काही पूर्वपदावर आणत असताना पुन्हा कोरोनाची साथ पसरु नये, यासाठी उपनगरी रेल्वेतील प्रवाशांवर मर्यादा आणण्यात आली आहे. त्यासाठी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच लोकल सुरु करण्यात आली. मात्र इतर लोकही लोकलने प्रवास  करत असल्याचे दिसून आले.

मुंबईने करून दाखवलं; दररोज केवळ 'इतक्याच' बेडची आवश्यकता...

त्यावर उपाय म्हणून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांकडे क्यूआर कोड पास असणे 20 जुलैपासून बंधनकारक असेल, असे पश्चिम रेल्वेने स्पष्ट केले आहे. कार्यालयातून देण्यात आलेला क्यूआर कोड पास नसल्यास स्थानकात प्रवेश दिला जाणार नाही अशी उद््घोषणा करण्यास पश्चिम रेल्वेने सुरुवात केली आहे. मध्य रेल्वेने याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही. 

मराठी चित्रपटसृष्टी येतेय हळूहळू पूर्वपदावर; टिझर लॉंचिंगसह चित्रीकरणाला सुरुवात...​

लोकलमधील सुरक्षित अंतराबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. हे सुरक्षित अंतर ठेवण्यासाठी रेल्वे प्रशासनाचे प्रयत्न सुरु होत आहेत. त्यासाठी सरकार, मुंबई महापालिका, मुंबई पोलिसांसह आम्ही क्यूआर पास तयार करीत आहोत. याबाबतची माहिती जमा करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. ती एका आठवड्यात पूर्ण होऊ शकेल. अर्थात याचबरोबर कार्यालयीन वेळेत बदल करण्याचा प्रस्तावही विचाराधीन आहे, असे रेल्वेच्या आधिकाऱ्यांनी सांगितले. क्यूआर कोड पास हा कर्मचाऱ्यांच्या ओळखपत्रासह लिंक असेल. त्यामुळे ओळख पटवणे सोपे होईल. त्याचबरोबर कलर कोडिंग असल्यामुळे तिकीट तपासणीही वेगाने होऊ शकेल, असेही त्यांनी सांगितले. 

उपचारांसोबत मानसिक आरोग्याची ही काळजी; सेंट जॉर्ज रुग्णालयात डॉक्टरांकडून समुपदेशन...​

रेल्वे पासचा दुरुपयोग होऊ नये यासाठी 2016 च्या मार्चमध्ये तत्कालीन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी क्यूआर कोडचा प्रस्ताव सूचवला होता. एकाच पासचा उपयोग अनेकजण करीत असल्याने रेल्वेच्या उत्पन्नावर परिणाम होत होता. आता हाच क्यूआर कोड यूटीएस तिकीट यंत्रणेस जोडण्याचा विचार होत आहे. त्यामुळे भविष्यातही गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी याचा उपयोग होऊ शकेल असा विचार केला जात आहे.

---
संपादन : ऋषिराज तायडे

loading image