उत्पन्नाचे स्रोत वाढवण्यावर एसटी महामंडळाचा भर; डिझेलवरून एलएनजीकडे वाटचाल...

msrtc bus
msrtc bus
Updated on

मुंबई : एसटी महामंडळ खर्चात कपात करण्यासह उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण करण्यावर भर देईल, अशी घोषणा परिवनह मंत्री अनिल परब यांनी शुक्रवारी केली. एसटीच्या ताफ्यात डिझेलवर चालणाऱ्या 18 हजार 500 बसगाड्या आहेत. महसुलाच्या 34 टक्के रक्कम इंधन खरेदीवर खर्च होते. हा खर्च कमी करण्यासाठी सुस्थितीत असलेल्या बस एलएनजी (द्रवरूप नैसर्गिक वायू) इंधनावर रूपांतरित करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर होणारे आर्थिक नुकसान व भविष्यात करावयाच्या उपाययोजना या संदर्भात परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड्. अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी मुख्यालयात बैठक झाली. या बैठकीत कोल्हापूरहून व्हिडिओ कॉलद्वारे परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांच्यासह एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने आणि वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. एसटी महामंडळाला आर्थिक नुकसानीतून सावरण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात, याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. पहिल्या टप्प्यात 1200 बस एलएनजी इंधनावर परिवर्तित करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

एसटी महामंडळाने सुरू केलेल्या मालवाहतुकीला चांगला प्रतिसाद मिळाला असून, एका महिन्यात 1907 फेऱ्यांद्वारे सुमारे 72 लाख रुपयांचा महसूल मिळवला आहे. डिसेंबर 2021 अखेर सुमारे 2000 मालवाहू वाहने तयार करून 250 कोटी रुपये महसूल मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी सरकारच्या वेगवेगळ्या विभागांची मालवाहतूक एसटी महामंडळाकडे वळवण्याला प्राधान्य देण्यात येणार आहे. 

एसटी महामंडळाच्या तीन मध्यवर्ती कार्यशाळांमध्ये बसगाड्यांची पुनर्बांधणी करण्यात येते. व्यावसायिक पद्धतीने खासगी बस बांधून महसूल मिळवण्याची योजना एसटी महामंडळाने तयार केली आहे. एसटी महामंडळाचे राज्यात नऊ टायर रिट्रेडिंग प्रकल्प आहेत. एसटीची गरज भागवून व्यावसायिक तत्त्वावर टायर पुन:स्थिरीकरण प्रकल्पाला चालना देण्यात येणार आहे. 

सायन रुग्णालयातील 'त्या' व्हिडिओची उच्च न्यायालयाकडून दखल; न्यायालय म्हणाले...

जागांचा व्यावसायिक वापर
ॲड्. अनिल परब यांनी एसटी महामंडळाच्या जागांचा व्यावसायिक वापर करण्याच्या दृष्टीने योजना तयार करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. फायद्याच्या मार्गांवरील बस फेऱ्यांची संख्या वाढवून अनुत्पादक किलोमीटरचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी सूचनाही त्यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com