MSRTC: सर्व एसटी बसचे रूपांतर ई-बसमध्ये होणार, महामंडळ २०० चार्जिंग स्टेशन उभारणार, परिवहनमंत्र्यांची घोषणा

MSRTC Charging Station: एसटी महामंडळ राज्यभरात २०० चार्जिंग स्टेशन उभारणार असून यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहेत, अशी माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली.
Pratap Sarnaik

Pratap Sarnaik

ESakal

Updated on

मुंबई : एसटी महामंडळातील सर्व बसचे रूपांतर २०३५पर्यंत ई-बसमध्ये करण्याच्या दृष्टीने राज्य शासन आणि एसटी महामंडळाकडून वेगाने प्रयत्न सुरू आहेत. या अनुषंगाने आवश्यक असलेल्या चार्जिंग सुविधांची उभारणी करण्यासाठी सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर राज्यभरात किमान २०० चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार असून, यासाठी लवकरच निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहेत, अशी माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com