
Mukesh Ambani at Lalbaugcha Raja Viral Video
ESakal
मुंबई : राज्यभरातील गणरायांचे विसर्जन झाले आहे. भाविकांनी गणेशाला भावपूर्ण निरोप दिला असून आता गणेश चतुर्थी २०२५ हा उत्सव अधिकृतपणे संपला आहे. असे असले तरीही सोशल मीडिया माध्यमावर गणेशोत्सवाचे अनेक व्हिडिओ पोस्ट केले जात आहेत. मुंबईतील सुप्रिसद्ध गणेश मंडळ म्हणून ओळखले जाणारे 'लालबागचा राजा' सार्वजनिक गणेशाचे दर्शन घेतानाचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. मात्र मुंबईच्या प्रतिष्ठित लालबागच्या राजा येथे मुकेश अंबानी यांनी घेतलेल्या दर्शनावेळी केलेल्या प्रार्थनेचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे.