मुंबईतील आगरी कोळी बांधवांनी 'पिठोरी अमावस्या' हर्षोल्हासात केली साजरी

दिनेश मराठे
सोमवार, 21 ऑगस्ट 2017

महिलांनी घेतली प्लास्टिक पिशव्या न वापरण्याची शपथ

मुंबई : श्रावणी अमावस्या, सोमवती अमावस्या आणि पिठोरी अमावस्या असा तिहेरी संगम घडून आलेली आजची 'पिठोरी देवीची पूजा करीत मुंबईतील आगरी कोळी बांधवांनी 'पिठोरी अमावस्या' हर्षोल्हासात केली साजरी केली.

महिलांनी घेतली प्लास्टिक पिशव्या न वापरण्याची शपथ

मुंबई : श्रावणी अमावस्या, सोमवती अमावस्या आणि पिठोरी अमावस्या असा तिहेरी संगम घडून आलेली आजची 'पिठोरी देवीची पूजा करीत मुंबईतील आगरी कोळी बांधवांनी 'पिठोरी अमावस्या' हर्षोल्हासात केली साजरी केली.

दक्षिण मुंबईतील कुलाबा, कफ परेड, गिरगाव, डोंगरी, उमरखाडी, प्रभादेवी, वरळी, माझगाव ताडवाडी तसेच शिवडी, चुनाभट्टी, मानखुर्द (आगर वाडी), खारदान्डा, वर्सोवा आदी मुंबईतील महत्वांच्या ठिकाणासह अन्य विविध ठिकाणी पारंपारीक पद्धतीने "पिठोरी अमावस्या" चौसष्ठ योगिणी पूजन हर्षोल्हासात महिलांनी आपापल्या पद्धतीने साजरी केली. उमरखाडी येथील दीपक डाके यांच्या घरी पिठोरी पूजन प्रसंगी उपस्थित महिलांनी सकाळ माध्यमाच्या प्लास्टिक मुक्त वसुंधरा या अभियानास सन्मान देत आम्ही या पुढे प्लास्टिक पिशव्या बाजार हाट करीता वापरणार नाही तर कापड़ी पिशव्याच वापरु अशी शपथ घेतली.

या पुजेची खासियत म्हणजे हा सण श्रावणी अमावस्येला साजरा करण्यात येतो तो मुख्यतः स्त्रियांच्या कर्तुत्वाला सलाम करण्यासाठीच असतो. कारण या पिठोरी समक्ष कुटुंबातील कर्त्या सावर्त्या महिला आपली कुटुंबातील जबाबदारी लीलया पार पाडताना कुटुंबातील तरुण पिढीच्या संरक्षणा साठी आणि वंश वृद्धी साठी प्रार्थना करतात. मुले व्यसनां पासून म्हणजेच दारु, वीडी, सिगरेट, गांजासह अंमली पदार्थां पासून दूर राहण्यासाठी खबरदारी घेतानाच मुला मुलीं कडून वाईट मार्ग अवलंबला जाऊ नये म्हणून विशेष दक्षता घेतात. 'पिठोरी'देवीची पूजा सजावट 'तेरडा- केवडा चाफा' यांचे या पूजेत अनन्य साधारण महत्व असते. निसर्गातील विविध रंगांच्या फुलांची-फळांची विविध रंगांतील विविध वनस्पतींची पुजेत महत्वाचे स्थान असल्याने एक प्रकारे निसर्ग संवर्धनाचा सन्देश पिठोरी देवता मानवजातीला देत असते.

दीपक डाके यांच्या मातोश्री पार्वती शंकर डाके यांनी आमच्या कुटुंबात गत 50 वर्षां पासून पिठोरी साजरी करीत असून, मुला मुलींच्या आयुष्यात उत्कर्ष, विद्याप्राप्ती, व्यवसाय वृद्धी आणि सर्वांत महत्वाचे म्हणजे वंशवेल मग ती मुलगी का असेना तिची पिढी वृद्धिंगत व्हावी म्हणूनच ही पूजा खास करुन करण्यात येते.

सुर्यस्ता आधी चित्र स्वरूपातील पिठोरी माता विविध फलांनी सजविण्यात येथे. तिला विविध अलंकारानी सजविण्यात येते. मणि मंगळ सूत्र, लक्ष्मी हार, कर्ण फुले-बिंदी सह साडी चोळी नेसविण्यात येते. आपापल्या ऐपती नुसार घरातील जुने सोन्याचे दागिने निदान कर्णफुल तरी देवीने परिधान करावी अशी प्रत्येक पिठोरी पूजकाची इच्छा असते. दिवे लागनीला पिठोरीची विधिवत पूजन करुन खना नारळाने ओटी भरून, गणेश पूजन, 64 योगिनी पूजन, अभिषेक, नैवेद्य विडा तांबूल, महाआरती आणि सूर्योदया पूर्वी नदी किंवा समुद्रात विसर्जन असा पुजेचा विधी असतो.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :
राज्यभर संततधार 
मोबाईल, गेम हिरावतोय लहानग्यांची दृष्टी!
बारामतीची साखर अन्‌ राज्यात पाऊस!
कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस
खंडाळ्याजवळ हुबळी एक्स्प्रेसवर दरड कोसळली
नकुशी बनली विश्‍वचषक विजेती
मुलीच्या येण्याने कुटुंब परिपूर्ण
केईएमच्या दारी नंदीबैलाची स्वारी 

Web Title: mumabi news koli samaj and pithori amavasya