BMC: मुंबई महापालिकेवर ५५ काेटींचा दावा! मुंबादेवी पार्किंगचे काम राेखल्याने नाेटीस

Robotic Parking Tower project: विधानसभा अध्यक्षांनी मुंबादेवी येथील रोबोटिक पार्किंग टॉवर प्रकल्पाला स्थगिती दिली होती. यामुळे आर्थिक नुकसान झाल्याने कंत्राटदाराने महापालिकेकडे कोट्यवधी रुपयांची मागणी केली.
BMC

BMC

ESakal

Updated on

मुंबई : मुंबादेवी येथील महत्त्वाकांक्षी रोबोटिक पार्किंग टॉवर प्रकल्पाला विधानसभा अध्यक्षांनी स्थगिती दिल्यानंतर हा वाद विकोपाला गेला आहे. या प्रकल्पाच्या कंत्राटदाराने महापालिकेला कायदेशीर नोटीस बजावून लवाद (आर्बिट्रेशन) कलमानुसार ५५ कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी केली आहे. कोणतेही ठोस कारण नसताना काम थांबवल्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा दावा या कंत्राटदाराने केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com