
Mumbai: महायुतीला प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारास व खातेवाटपास १५ दिवस झाल्यानंतरही मुहूर्त मिळून खातेवाटप जाहीर झाले असले तरी अजूनही १८ मंत्र्यांनी पदभार स्वीकारलेला नाही. या मंत्र्यांमधील अनेकजण विश्रांतीसाठी परदेशी वारीला गेले असल्याची माहिती मिळत आहे.
प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर महायुती सरकारमध्ये मंत्र्यांना शपथविधी झाल्यानंतर खातेवाटप करण्यात आले. मात्र, आता खातेवाटप झाल्यानंतर मंत्र्यांना दालने देण्यात आली असली, तरी अजूनही १८ मंत्र्यांनी पदाची सूत्रे हाती घेतलेली नाहीत.