
मुंबई : मुंबईत मढ समुद्रात दोन मासेमारी बोटींची धडक झाल्याची घटना घडलीय. मोठ्या मालवाहू जहाजाची धडक बसून मासेमारी करणारी बोट समुद्रात बुडाली. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. पण या दुर्घटनेमुळे पुन्हा एकदा समुद्रात जहाजांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय. आठवड्याभरापूर्वी गेटवे ऑफ इंडियाजवळ बोट उलटून भीषण दुर्घटना घडली होती. त्यात काहींचा मृत्यूही झाला होता.