

Mumbai Accident
ESakal
मुंबई : राज्यभरात १२ दिवस गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा केल्यानंतर काल अनंत चतुर्थीदिवशी भक्तिमय वातावरणात बाप्पाला निरोप देण्यात आला. गणरायाच्या विसर्जनासाठी अनेक ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी जमली होती. मात्र मुंबईत विसर्जन मिरवणुकीत धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. प्रभादेवीत ‘KG मार्गचा राजा’च्या विसर्जन मिरवणुकीत एक कार घुसल्याची घटना घडली आहे. या घटनेत ४ जण जखमी झाल्याचे समोर आले आहे.