मुंबई : लुटीप्रकरणी अटक आरोपीचा जामीन नामंजूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

मुंबई : लुटीप्रकरणी अटक आरोपीचा जामीन नामंजूर

मुंबई : भारतीय ऑलिंपिक हॅण्डबॉल समिती आणि उत्तर प्रदेश ऑलिंपिक असोसिएशनचे सदस्यत्व मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवून कोटी रुपयांची लूट केल्याचा आरोप असलेल्या आरोपीचा अटकपूर्व जामीन मुंबई उच्च न्यायालयाने नामंजूर केला आहे. या प्रकरणात आरोपीची पोलिस कोठडीत सविस्तर चौकशी होणे आवश्यक आहे, असे मत न्या. सुरेंद्र तावडे यांनी व्यक्त केले.

अब्दुल रेहमान वानू यांनी सांताक्रूझ पोलिस ठाण्यात त्याबाबत फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार त्यांना भारतीय ऑलिंपिक हॅण्डबॉल समितीचे सदस्यत्व हवे होते. यादरम्यान त्यांची भेट आरोपी जोसेफ अँथनी कॅस्टेलिनो याच्याशी झाली. आपली धर्मेंद्र सिंग या व्यक्तीशी ओळख असून तो ऑलिंपिक सदस्यत्व मिळवून देण्यास मदत करू शकतो, असे कॅस्टेलिनोने वानूला सांगितले आणि त्याच्याकडून तीन कोटींहून अधिक रुपये घेतले.

हेही वाचा: दिल्लीच्या सीमांवरील बॅरिकेड्स हटवले; पोलिसांनी सांगितले कारण...

काही कालावधीनंतर आपली फसवणूक झाली असल्याचे समजताच वानू यांनी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. त्यानुसार कॅस्टेलिनोसह धर्मेंद्र सिंग आणि राकेश कुमार यांच्यावर भारतीय दंडसंहिता कलम ४०६, ४२० आणि ३४ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला. त्यामुळे कॅस्टेलिनोने उच्च न्यायालयात धाव घेत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला; मात्र न्यायालयाने तो नामंजूर केला.

loading image
go to top