

Mumbai-Ahmedabad Bullet Train
ESakal
मुंबई : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील पहिल्या टप्प्यात आता विजेचा प्रवास सुरू होणार आहे. सुरत ते बिलिमोरा दरम्यानच्या सुमारे ५० किलोमीटरच्या मार्गावर शुक्रवारी (ता. २०) ओव्हरहेड वायरमध्ये वीजप्रवाह सुरू करण्यात येणार आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा असून, या मार्गावरील उन्नत रेल्वे मार्गाच्या अप आणि डाऊन अशा दोन्ही मार्गावर विद्युत यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे.