मुंबई-अहमदाबाद मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी, २० किमीपर्यंत वाहनांच्या रांगा; पुर्णेकर समर्थकांच्या आंदोलनाचा फटका

Mumbai Ahmedabad Highway traffic: नौपाडा इथं प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणातील संशयितांना अटक करण्याच्या मागणीसाठी पूर्णेकर कुटुंबिय आणि समर्थकांनी आंदोलन केलं. याचा फटका मुंबई-अहमदाबाद मार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे.
Mumbai Ahmedabad Highway traffic

Mumbai Ahmedabad Highway traffic

Esakal

Updated on: 

Mumbai Traffic: प्रदीप ऊर्फ बाळू पुर्णेकर यांच्या हत्येप्रकरणी संशयितांना अटक करण्याच्या मागणीवरून ठाण्यात रात्रभर आंदोलन सुरू होते. हे आंदोलन सकाळी स्थगित करण्यात आलं आहे. मात्र या आंदोलनाचा मोठा फटका मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वाहतुकीला बसला. आंदोलनामुळे मुंबई आणि ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर रात्रीपासून वाहतूक ठप्प झाली. वर्सोवा ब्रिजपासून विरारच्या हद्दीपर्यंत तब्बल २० किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com