

Mumbai-Ahmedabad Highway Traffic
ESakal
पालघर : पालघर जिल्ह्यासह दक्षिण गुजरातमध्ये सलग दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे शुक्रवारी (ता. २४) मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील १५ तासांच्या रखडपट्टीने हजारो प्रवाशांचे अक्षरशः हाल केले. दोन्ही दिशेने २० किलोमीटरपर्यंत लागलेल्या वाहनांच्या रांगांमध्ये महिला, लहान 1 मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्ती अन्न-पाण्याविना अडकून पडल्या होत्या. शौचालयांसारख्या मूलभूत सुविधांचाही अभाव असल्याने त्यांना प्रचंड कुचंबणेला सामोरे जावे लागल्याने आपत्कालीन यंत्रणा आणि नियोजनाचा अभाव उघड झाला आहे.