Mumbai Airport: मुंबई विमानतळ सुसाट; एका महिन्यात ४० लाख ४६ हजार प्रवाशांनी केला प्रवास

mumbai airport
mumbai airport esakal

Mumbai Airport: दिवाळीच्या सुटयात बाहेरगावी जाणाऱ्या नागरिकांची आणि पर्यटकांनी विमान प्रवासाला पसंती दिली आहे. गेल्या महिन्यात मुंबई विमानतळावरून ४० लाख ४६ हजार प्रवाशांनी विमान प्रवास केला आहे. कोविडपूर्व म्हणजेच नोव्हेंबर २०१८ मधील प्रवासी वाहतुकीच्या तुलनेत यंदाच्या प्रवासी क्षमतेत लक्षणीय म्हणजेच १०९ टक्के वाढ झाली आहे.

mumbai airport
Navi Mumbai Airport: शरद पवारांनी दिला नैना प्रकल्पाच्या विरोधाला पाठिंबा !

देशातील सर्वांत व्यस्त विमानतळ म्हणून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाची ओळख आहे, तसेच दिवाळी हंगाम्यात बाहेर गावी जाणाऱ्या आणि पर्यटक स्थळी भेट देणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढते.

यंदाच्या दिवाळी सुटयाच्या कालावधीत म्हणजे नोव्हेंबर २०२३ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून तब्बल ४० लाख ४६ हजार प्रवाशांनी ये-जा केली आहे. ११ नोव्हेंबरला आतापर्यतच्या सर्वाधिक १ हजार ३२ विमानांची वाहतूक झाली तर २५ नोव्हेंबरला एका दिवसात १ लाख ६७ हजार १३२ प्रवाशांनी प्रवास केला.

mumbai airport
Mumbai International Airport: अचानक लागली विमानाला आग अन प्रशासन लागले कामाला; विमानतळावर २ तासांचा गोंधळ

यात देशांतर्गत मार्गावर १ लाख २० हजार तर आतंरराष्ट्रीय मार्गावर ४६ हजारांपेक्षा जास्त प्रवाशांनी प्रवास केला.यामध्ये दिल्ली, बेंगळुरू आणि चेन्नई याठिकाणी देशांतर्गत प्रवासाला तर दुबई, लंडन आणि अबूधाबी याठिकाणी आंतरराष्ट्रीय प्रवासाला सर्वाधिक पसंती देण्यात आली. लक्षणीय बाब म्हणजे, मुंबई-दिल्ली या गजबजलेल्या एकाच मार्गावर सीएसएमआयएने ५५७,३९३ पॅक्स एवढ्या प्रचंड वाहतुकीची नोंद केली.

मुंबई-दिल्ली मार्गावर ५ लाख ५७ हजार ३९३ प्रवाशांची सर्वाधिक वाहतूक झाली. एअरलाइन्समध्ये, इंडिगो, विस्तारा आणि एअर इंडिया देशांतर्गत प्रवासासाठी आघाडीवर आहेत. इंडिगोने १ लाख ६० हजारांपेक्षा जास्त प्रवाशांना सेवा दिली. आतंरराष्ट्रीय मार्गावर इंडिगो, एअर इंडिया आणि एमिरेट्सने सर्वाधिक सेवा दिली.

mumbai airport
Mumbai Airport: दिवाळीत मुंबई विमानतळावर घडला इतिहास; तब्बल १ हजार विमांनांची ये- जा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com